करुणा परळीत आल्या अन् अॅट्रोसिटी दाखल

करुणा परळीत आल्या अन् अॅट्रोसिटी दाखल

    05-Sep-2021
Total Views |
Karuna _1  H x



पत्रकार परिषदेचं पुढे काय झालं वाचा सविस्तर


परळी : करुणा ज्या स्वतःला धनंजय मुंडे यांच्या पत्नी मानतात. त्यांच्यावर झालेल्या कथित अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी रविवारी पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यासाठी त्या दुपारी दोन वाजता परळीत दाखलही झाल्या होत्या. मात्र, पोलीसांनी त्यांना स्थानबद्ध केले. यावेळी त्यांचा मुलगाही सोबत होता.


करुणा यांचा दोन दिवसांपूर्वी एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही येत असल्याचे त्यांनी सांगितले. या विरोधात आवाज उठविण्यासाठी परळीत येऊन पत्रकार परिषद घेणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. यामुळे परळीत तणावपूर्ण वातावरण होते. परळी पोलीस ठाण्याबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.


सात-आठ महिन्यांपासून राज्याची सामाजिक व न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा मुंडेंचा विवाद सुरू आहे. या संदर्भात एक पत्रकार परिषद घेऊ, अशी घोषणा त्यांनी केली होती. मात्र, या प्रकरणामुळे परळीत मोठा तणाव निर्माण झाला. करुणा मुर्दाबादच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. सकाळी १० वाजता त्या बीडमध्ये आल्या.


११ वाजता परळीत दाखल होणाऱ होत्या. मात्र, त्या पोहोचल्याच नाहीत. अडीच वाजता परळीत आल्यानंतर त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. शहरात पत्रकार परिषद होणार या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याच दरम्यान नगरपालिका कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्या प्रकरणीत त्यांच्याविरोधात अॅट्रोसिटी दाखल करण्यात आला.


पत्रकार परिषदेत माध्यमांवरही बंधन



राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे सध्या करुणा शर्मा नामक महिलेमुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. करुणा शर्मा या स्वत:ला धनंजय मुंडे यांच्या पत्नी मानतात. तसेच सोशल मीडियावर त्या नेहमी त्यांचा उल्लेख करुणा धनंजय मुंडे असा करतात.


करुणा शर्मा यांनी जाहीर केलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी असे कोणतेही साहित्य प्रसिद्ध किंवा प्रकाशित करण्याचा प्रयत्न केल्यास तो उच्च न्यायालयाचा अवमान ठरणार आहे. न्यायिक प्रक्रियेनुसार कोणत्याही प्रसिद्धी माध्यमाने ते साहित्य प्रसिद्ध करणे देखील उच्च न्यायालयाचा अवमानच ठरतो. त्यामुळे अशा कोणत्याही साहित्याला प्रसिद्धी माध्यमांनी प्रकाशित किंवा प्रसिद्ध करू नये असे पत्र धनंजय मुंडे यांच्या या प्रकरणातील वकील सुषमा सिंह यांनी सर्व प्रसार माध्यमांना पाठवले आहे.