महिला-बाल हक्क जनजागृती करणार्‍या जयश्री कर्वे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Sep-2021   
Total Views |

Jayashtrree _1  




एखादी महिला उच्च शिक्षण घेते. ते शिक्षण तिच्या उपजीविकेची साधन होऊ शकते. मात्र, शिक्षण घेऊन चांगल्या क्षेत्रात काम करणार्‍या महिलांना सामाजिक कार्याची आवड असते. हीच आवड जोपासत सीए असलेल्या जयश्री कर्वे यांनी कायद्याचेही शिक्षण घेतलेले आहे. त्यामुळे त्यांनी महिला आणि बालहक्कांच्याविषयी जनजागृती केली आहे. त्यांच्या कार्यावर टाकलेला हा प्रकाश... 



जयश्री यांचे बालपण ठाण्यात गेले. त्यांचे शालेय शिक्षण सुलोचना देवी सिंघानिया स्कूलमध्ये झाले. बेडेकर महाविद्यालयातून त्यांनी बी.कॉमचे शिक्षण घेतले. पदवी घेतल्यानंतर त्यांनी सीएचे शिक्षण घेण्यास सुरूवात केली. हे शिक्षण घेत असतानाच त्यांनी दुसर्‍या बाजूला एलएलबीचे शिक्षण घेण्यास सुरूवात केली होती. एलएलबीच्या प्रथम वर्षाला जयश्री या प्रथम आल्या होत्या. शिक्षण सुरू असतानाच त्यांचा उदय कर्वे यांच्याशी विवाह ठरला. १९८६ ला त्यांचा विवाह झाला आणि त्या डोंबिवलीकर झाल्या. त्याकाळात डोंबिवलीकर फार पुढारलेले नव्हते. सासरच्या मंडळींनी जयश्री यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे लग्नानंतर त्यांनी सीएचे शेवटचे वर्ष आणि एलएलबीची दोन वर्षे पूर्ण केली. प्रथम एलएलबीचे वर्ष पूर्ण केले. त्यानंतर सीएचे शिक्षण पूर्ण केले.
जयश्री या मॉडेल महाविद्यालय आणि एसएनडीटी महिला विद्यालयात दोन वर्ष प्राध्यापिका होत्या. १७ वर्षे पेंढारकर महाविद्यालयात त्या ज्ञानदानाचे काम करत होत्या. बीएमएस विभागाच्या त्या समन्वयक होत्या. या काळात त्यांनी विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविले. त्यामध्ये त्यांनी ‘करिअर फेस्ट’ उपक्रम राबविला. त्यामध्ये वेगवेगळ्या संस्थेचे स्टॉल लावत असत. विद्यार्थ्यांसाठी एनजीओ संस्थांना भेटी देत होत्या. कर्करोग रुग्णांसाठी शिबीर घेतले होते. सुवर्ण महिला सहकारी बँकेत त्या १५ वर्षे कार्यरत होत्या. त्यात त्यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष अशी पदे भूषविली आहेत. आता सुवर्ण महिला सहकारी बँकेचे डोंबिवली नागरी सहकारी बँकेत विलिनीकरण करण्यात आले आहे. जयश्री यांच्यासह त्यांच्या १३ जणांची एक ‘सीए फर्म’ आहे. त्यांची ही फर्म कल्याण-डोंबिवलीतील सर्वात मोठी फर्म आहे.
विजय शेलार, सुहास आंबेकर असे १३ पार्टनर त्यात आहेत. २०१४ साली समविचारी महिला एकत्र आल्या. महिला संस्था खूप आहेत. त्यामुळे अजून एक महिला संस्था काढायची नव्हती. महिला संस्थेला ‘कनेक्टिव्हीटी’ असायला हवी. सगळ्यांनी एकत्रित काहीतरी करायला पाहिजे. आठपेक्षा जास्त संस्था या महासंघाशी जोडलेल्या आहेत. महिलांनी त्यांचा ग्रुप तयार करून शाळांना भेटी दिल्या. त्यामध्ये ३० पेक्षा जास्त शाळांचा समावेश होता. शाळेसाठी ‘चाईल्ड पॉलिसी’ तयार केली. मुलांची काळजी कशी घेतली पाहिजे, त्यांचे शोषण होऊ नये, त्यांचा विकास कसा होईल, या सगळ्यांचा विचार केला होता. 30 पेक्षा जास्त शाळांमध्ये ‘पीपीटी’च्या माध्यमातून त्यांचे प्रेझेंटेशन केले होते. संयुक्त महिला मंडळ आणि परिवर्तन महिला संस्था तसेच महाविद्यालयासाठी महिला आयोगाचे प्रायोजकत्व मिळवून त्या त्या संस्थासाठी मिळवून दिले.


बाल हक्क आयोग आणि विविध संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बालकांचे हक्क संरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून कार्यक्रम हाती घेतला होता. कायदेशीर माहिती देणारे पाच विभागांत कार्यक्रम घेतले होते. ‘पोलीस मित्र’ यांना सामाजिक काम करण्याच्या उद्देशाने आलेले होते. त्यांना कायदेशीर माहिती पाहिजे. त्यांना आवश्यक ज्ञान हवे होते. सामान्य कायद्याची माहिती देणारे सात कार्यक्रम घेतले. त्यांनी काही ‘टॉपिक’ सुचविले ते पुढच्या सत्रात समावेश करून घेतले जात होते. जयश्री या सध्या जांभूळपाड्यातील पाच मुलींना मोफत शिक्षण देण्याचे काम करीत आहे. ‘कोविड’मध्ये विशेषत: मुलींचे शिक्षण थांबविले जाते. त्या महाविद्यालयात जातात. पण त्यांचे ‘ऑनलाईन’ शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना अकाऊंट्स हा विषय शिकविण्याचे काम करीत आहे.

जयश्री वेगवेगळ्या महाविद्यालयात जाऊन ‘पोक्सो’ या विषयावर अ‍ॅड. मनिषा तुळपुळे, अ‍ॅड. तृप्ती यांच्या सोबतीने मुलांना सांगण्याचा प्रयत्न करीत असतात. सध्या त्यांनी संपर्क डायरी करायला घेतली आहे. त्यामध्ये १५ कायदे महिला, बालक आणि ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित कायदे असणार आहेत. या कायद्याचा जयश्री या अभ्यास करीत आहेत. त्या एलएलबी असल्यामुळे त्यांना ते समजत आहे. प्रत्येक कायदा सोप्या मराठी भाषेत लिहिण्याचे काम करीत आहेत. त्या कायद्यातून सोयी काय आहेत? कायद्याने कोणत्या सुरक्षा दिल्या आहेत. कायद्याचे दार कधी ठोठावू शकतात. सुरक्षा, पेन्शन किंवा स्कीम यांची माहिती दिली जाणार आहे. वेगवेगळ्या हेल्पलाईन असणार आहेत.

फिटनेससाठी जीम आहे. त्यांची थोडक्यात माहिती देणार. वृद्धाश्रम, चिल्ड्रेन होम, चाईल्ड वेल्फेअर कुठे आहेत, हे अनेकांना माहिती नसते. त्यांची माहिती देणार आहेत. महिला सुरक्षित आणि सक्षमीकरण यावर विशेष भर दिला जाणार आहे. नोव्हेंबरच्या सुरूवातीला ती डायरी प्रकाशित केली जाणार आहे. तरूणांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ‘अ‍ॅक्टिव्हिटी’ करणार आहे. या तरूण पिढीला सामाजिक कामांची आवड नाही असे नाही, पण ही पिढी सध्या मोबाईलमध्ये अडकली आहे. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांना ‘अ‍ॅक्टिव्हिटी’ दिली जाणार आहे. ‘कोविड’ काळात वेगवेगळे लेख, कविता यावर गट करून बक्षिसे दिली होती. त्या बक्षिसांच्या रक्कम ज्या स्पर्धकांना इच्छा होती, त्यांनी ‘वनवासी कल्याण आश्रमा’ला रक्कम द्यावी, असे आवाहन केले होते. ज्यांनी ती रक्कम दिली त्यांची रक्कम ‘वनवासी कल्याण आश्रमा’ला दिली. महिला आणि बालक यांच्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून काम करणार्‍या जयश्री कव्रे यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा...!


@@AUTHORINFO_V1@@