संघाचे काम राष्ट्रहिताचे ; प्रवीण दरेकरांचे अख्तरांना प्रत्युत्तर

संघाचे काम राष्ट्रहिताचे ; प्रवीण दरेकरांचे अख्तरांना प्रत्युत्तर

    04-Sep-2021
Total Views |

RSS_1  H x W: 0
 
मुंबई : बॉलीवूडचे प्रसिद्ध संगीतकार, लेखक जावेद अख्तर हे अनेकवेळा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकवेळा चर्चेत आले आहेत. आत त्यांनी विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीची तुलना तालिबानी विचारसारणीशी केल्यामुळे चहूबाजूंनी त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यांनी केलेल्या या टीकेवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी त्यांना, "आधी संघाच्या इतिहासाचा अभ्यास करावा. संघाने नेहमी राष्ट्रहिताचे काम केले आहे. रा. स्व. संघाबद्दल त्यांनी केलेल्या या वक्तव्याचा मी निषेध करतो."
 
 
 
 
 
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी टीका करताना म्हंटले आहे की, "जावेद अख्तर यांनी सर्वप्रथम संघाच्या इतिहासाचा अभ्यास करावा. संघाचे काम हे राष्ट्रवादाचे, राष्ट्रहिताचे असते. राजकारणापलीकडे जाऊन संघ सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करणारी संघटना आहे. जावेद अख्तर यांनी केलेलं वक्तव्य हे राष्ट्रवादी विचारांच्या विरोधातले आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या या वक्तव्याचा मी निधेढा करतो." असे त्यांनी म्हंटले आहे.
 
 
 
 
 
पुणे भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनीदेखील त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत म्हंटले आहे की, "जावेद अख्तर यांनी मूळ मुद्दयांवर बोलावे, हिंमत असेल तर तालिबानचा जाहीर निषेध त्यांनी करावा. तालिबानांचे कृत्य त्यांना माहिती नाही का? त्यांच्या हीन कृत्यांची तुलना कशाचीच होऊ शकत नाही. जावेद अख्तर यांनी फक्त चर्चेत राहण्यासाठी म्हणून बेछूट आरोप करू नयेत."
 
 
 
 
 
भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी याच मुद्द्यावरून जावेद अख्तर यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हंटले आहे की, "भारताची सत्ता संघ स्वयंसेवकांच्या हाती असतानाही तालिबानी डीएनए असलेले जावेद अख्तर सारखे देशद्रोही आमच्या देशात सुरक्षित पणे राहतात आणि वाट्टेल तसे विषारी फुत्कार सोडतात यातूनच संघाचे धोरण आणि विचारधारा लक्षात येते. पण भेदवृत्ती असलेल्या या समाजकंटकांना कसे कळणार?" अशी टीका त्यांनी केली आहे.