मुंबई : बॉलीवूड ड्रग्स प्रकरणी एनसीबीला आणखी एक यश मिळाले आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा मित्र आणि एका मोठ्या हॉटेलचा संचालक कुणाल जानीला अटका करण्यात आली आहे. . एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी कुणाल याला अटक केली आहे. सुशांतच्या मृत्युनंतर कुणाल हा फरार होता. त्याच्यावर गुन्हा क्रमांक २४/२०२०मध्ये अटक केली गेली आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन समोर आले होते. यावेळी वांद्रे येथील हॉटेलचा संचालक कुणाल जानी याचीही या प्रकरणी चौकशी करण्यात आली होती. माध्यमांच्या अहवालानुसार कुणाल जानी हा त्या व्हॉट्सअॅप ग्रुपचा एक भाग होता, ज्यात रिया चक्रवर्ती देखील सहभागी होती. ईडीला रियाच्या फोनवर ड्रग्ज संदर्भातील चॅट सापडले होते, ज्यामध्ये कुणाल सहभागी होता. या चॅटमध्ये दोघेही चरस आणि डूबीज या ड्रग्जबद्दल बोलले होते. यावेळी ईडीनेही कुणालची 6 तास चौकशी केली होती. मात्र, यानंतर तो फरार झाला होता.