महिला अत्याचारी नराधमांचे वकीलपत्रही घेऊ नका!

बार कौन्सिलकडे मनसेची मागणी

    27-Sep-2021
Total Views |
News _1  H x W:





मुंबई :
महिलांवर निर्घृण अत्याचार करणाऱ्या नराधमांचे वकिलपत्र वकिलांनी घेऊ नये, अशी आग्रही विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस रिटा गुप्ता यांनी 'बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा' संघटनेच्या अध्यक्षांना केली आहे. राज्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर माणूसकीला काळीमा फासून, निर्घृण अत्याचार करून राक्षसीपद्धतीने अत्याचार करणाऱ्या आरोपींचे व्यावसायिक, नैतिकता व सामाजिक बांधिलकीचे भान लक्षात घेत एकाही आरोपीचे वकीलपत्र घेऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.
 
 
 
रिटा गुप्ता आपल्या पत्रात म्हणाल्या की, "राज्यात वारंवार बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या घटना उघडकीस येत आहेत. त्यातील गंभीर बाब म्हणजे घटनांमधील पीडिता या अल्पवयीन आहेत. डोंबिवलीत घडलेली घटना संतापजनक आहे. १५ वर्षाीय मुलीवर २९ नराधमांनी विविध ठिकाणी सामूहिक बलात्कार केला. साकीनाका,खेरानी रोड परिसरात ९ सप्टेंबर रोजी बलात्कार झालेल्या ३० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
 
 
पीडितेला एवढ्या निघृण अत्याचाराचा सामना करावा लागला. हे अत्याचार पाहता या प्रकरणाचं गांभीर्य उघडकीस येत आहे. पीडित महिलेवर राक्षसी पद्धतीनं बलात्कार करण्यात आला. साडेतेरा वर्षांच्या मुलीवर १४ लोकांनी बलात्कार केला. सहा वर्षाच्या मुलीवर रिक्षामध्ये बलात्कार झाला, अमरावतीमध्ये एका १७ वर्षाच्या सात महिन्याची गर्भवती असलेल्या मुलीवर बलात्कार झाला.
 
 
तिने फाशी घेत स्वतःला संपवले. पुण्यात तीन घटना घडल्या असून एक गँगरेपची घटना आहे. पुणे रेल्वे स्थानकात मित्राला भेटण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. वानवडी परिसरात राहणाऱ्या या १४ वर्षीय मुलीला घरी सोडतो, असं म्हणत रिक्षाचालकाने तिला भलतीकडेच नेलं. त्यानंतर अनेकांनी तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी आतापर्यंत १६ जणांना अटक करण्यात आली आहे.
 
 
तसेच पुणे रेल्वे स्थानक परिसरातच एका सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला आईच्या कुशीत झोपलेली असताना आरोपी रिक्षाचालकाने मुलीचे अपहरण कस्न बलात्कार केल्याची घटना समोर आली. हे नराधम इतके पाशवी कसे असू शकतात, असा प्रश्न सामान्य नागरिकांना सातत्याने भेडसावत आहे.
 
 
मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. महिलेवर बलात्कार करण्यात आल्यानंतर गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय प्रकार समोर आला आहे. दरम्यान, सर्व याप्रकरणी लवकरात लवकर आरोपपत्र दाखल कस्न खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवून पीडितेला न्याय देण्याचा प्रयत्न सुरु आहे.
 
 
'महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे का?,'असे राक्षसी अत्याचार कस्न बलात्करांचे प्रकरणे यांतून कुठले पुरोगामित्व सिद्ध होते? तसेच महाराष्ट्र राज्य हे महिलांसाठी सुरक्षित आहे का?असे प्रश्न महिलांना भेडसावत आहेत.भारतीय राज्यघटनेत नमूद असलेली तत्त्वे शाबूत ठेवण्याचे काम भारतातील लोकांनाच करावे लागेल.आणि आपण ही जबाबदारी सक्षम पार पाडू शकता असा आमचा ठाम विश्वास आहे.
 
शिक्षा काय करायची हे न्यायालय ठरवतं,पण बलात्कार प्रकरणातील सर्व नराधमांना त्वरित फाशीच व्हायला हवी ही जन भावना लक्षात घेता तमाम भारतीयांच्या वतीने, पीडित कुटुंबियांना त्वरित न्याय मिळण्याच्या हेतूने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा ह्यांस विनंती करते कि, व्यावसायिक नैतिकता व सामाजिक बांधिलकीचे भान लक्षात घेता वरील नमूद अथवा कोणत्याही बलात्कार प्रकरणातील आरोपीचे वकीलपत्र वकिलांनी न घेऊन अवघ्या जगा समोर एक आदर्श उभा करावा,हीच बलात्कारामुळे दुर्दैवी मृत्यमुखी पडलेल्या व बलात्कार पीडितांना आपणांसकडून खरी श्रद्धांजली ठरेल, अशी विनंती गुप्ता यांनी मनसेच्या वतीने वकीलांना केली आहे.