मोदींनी उल्लेख केलेल्या 'पिबन्ति नद्यः, स्वयमेव नाम्भः' या उक्तीचा अर्थ काय ?

पंतप्रधान मोदींनी मन की बातद्वारे हे आवाहन केले

    26-Sep-2021
Total Views |

Pm modi_1  H x





नवी दिल्ली
: “नद्यांना प्रदूषणुक्त करण्यासाठी वर्षातून एकदा तरी नदी उत्सव साजरा करूया,” असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, दि. 26 सप्टेंबर रोजी रेडिओवरील आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमामधून देशवासीयांना केले. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी जागतिक नदी दिनानिमित्त नद्यांचे महत्व सांगितले. ते म्हणाले, “‘जागतिक नदी दिन’हा एक दिवस आहे जो आपण सर्वांनी लक्षात ठेवला पाहिजे. हा दिवस असा आहे जो भारताच्या परंपरांशी जुळलेला आहे.
 
 
 
पिबन्ति नद्यः, स्वय-मेव नाम्भः
 
याचा अर्थ नद्या स्वतःचे पाणी पीत नाहीत, तर त्या दान करतात. आपल्यासाठी नद्या ही भौतिक वस्तू नाही, नदी ही एक सजीव वस्तू आहे आणि म्हणूनच आपण नद्यांना माता म्हणतो. आपल्याकडे एवढे सण आणि उत्सव आहेत. हे सर्व आपल्या आईच्या कुशीत आपण साजरे करतो,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. “गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वति. नर्मदे सिन्धु कावेरी जले अस्मिन् सन्निधिं कुरु ॥’ आपल्या देशात स्नानावेळी हा श्लोक म्हणण्याची परंपरा होती. आपल्या कुटुांतील ज्येष्ठ मंडळी लहान मुलांना हा श्लोक म्हणायला शिकवायची. यामुळे देशात नद्यांद्दल श्रद्धा निर्माण होत होती. भव्य भारतानचे एक चित्र समोर उभे ठाकत होते. नद्यांशी आपण जोडले जात होतो. ज्यावेळी नदीला आपण एका मातेच्या स्वरुपात जाणतो, पाहतो, जगतो त्या दिवशी एक श्रद्धा निर्माण होते, ही संस्काराची प्रक्रिया होती,” असे ते यावेळी म्हणाले.
 
 
 
“माघ महिना येतो, तेव्हा आपल्या देशातील बरेच नागरिक गंगा किंवा इतर कोणत्याही नदीच्या काठावर संपूर्ण महिना पूजा करतात. आपण घरी स्नान करतानाही नद्यांची आठवण करण्याची पूर्वीची परंपरा होती. आज ती कदाचित नाहीशी झाली असेल किंवा फार कमी प्रमाणात जिवंत राहिली असेल, पण ती खूप मोठी परंपरा होती. यातून पहाटे आंघोळीवेळी विशाल भारताची सहल होत होती. ती एक मानसिक यात्रा होती. हे देशाच्या कोनाकोपर्‍याशी जोडण्याची प्रेरणा बनत होती,”अशी आठवण यावेळी मोदी यांनी करून दिली.छोट्या प्रयत्नांमुळे कधी कधी मोठे बदल घडतातमोदींनी यावेळी स्वच्छतेचे महत्त्व देखील सांगितले. महात्मा गांधींनी स्वच्छतेला स्वातंत्र्याच्या स्वप्नाशी जोडले आहे.
 
 
 
कुठल्याही गोष्टीला छोटी समजण्याची चूक कधीही करू नका. छोट्या प्रयत्नांमुळे कधी कधी मोठे बदल घडतात. आपण महात्मा गांधींच्या जीवनाकडे पाहिले तर त्यांच्या आयुष्यात लहान लहान गोष्टी किती महत्त्वाच्या होत्या, हे दिसून येईल. स्वच्छता मोहिमेने स्वातंत्र्य चळवळीला सतत ऊर्जा कशी दिली हे आजच्या आपल्या तरुणांना माहित असले पाहिजे. महात्मा गांधींनीच स्वच्छतेला जनआंदोलन बनवण्याचे काम केले होते. महात्मा गांधींनी स्वच्छतेला स्वातंत्र्याच्या स्वप्नाशी जोडले होते,” असे देखील मोदी सांगायला विसरले नाहीत.