धोतराचे ‘रिमिक्स’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Sep-2021   
Total Views |

devendra fadnvis_1 &
यंदा दसरा-दिवाळीला लोक डीजे लावतील. डीजेवर रिमिक्स केलेले धम्माल गाणे असेल. त्या गाण्यात ‘धोतरेही पेटतील’ असा मुख्य सूर असून, ‘मला माहिती नाही’ या सुराचा कोरस असणार आहे. ‘जाऊ दे’ तर असा दम दिला आहे राज्यपालांना. काय करणार राज्यपाल काकांनी नकोसे केले आहे. त्यातच ते ‘पुन्हा येईन’ म्हणणारे फडणवीस पुन्हा आले असते तर चालले असते. इतके फडणवीसांनी न येताही आम्हाला पिडले आहे. एखाद्याला पिडायचे तरी किती? उत्तर तरी किती द्यायची आम्ही? आम्हाला प्रश्न विचारायची सवय होती. पण, आता कमळवाले प्रश्न घेऊन उभेच!!
ते तर ते आमचेच लोक बारामतीकर काकांची खोड काढतात. कितीदा सांगतो, अरे गप्प बसा रे; पण नाही, यांचे खोड्या करणे सुरूच! काय तर म्हणे ते आमचे नेते नाहीत. पण, मी म्हणतो, तुमची तयारी असेल त्यांना नेते न मानायची. पण, त्यांची तयारी आहे का तुमचे नेते न म्हणवून घ्यायची? अशाच कठीण काळात ते पटोले पटायचे काही नाव घेत नाहीत. ‘मॅडम’च्या मर्जीशिवाय हे होत असेल का? ‘मॅडम’च्या पतीच्या नावाने योजना काढल्या. ‘मॅडम’च्या सुपुत्राचीही किती स्तुती करत असतो. पण, पटोले सदान्कदा घोळ घालतच असतात. काय होईल काय माहिती? काय म्हणता, ‘कर नाही त्याला डर कशाला?’ मग डरू नाही तर काय करू? या बाजूने राज्यपाल, दुसर्‍या बाजूने भाजपचे नेते आणि समोर ते फडणवीस अशा कोंडीत आहोत. कुठे आहे तो खंजीर, वाघनख, कोथळा काढू, हे शब्द जरी एकले तरी आता लोक खदाखदा हसतात. त्यामुळे जरा वेगळे बोललो, तुमची धोतरे पेटतील. पण, आता त्यांचे धोतर पेटण्याची भाषा करून आमच्याच सत्तेची राख होते की काय, असे वाटू लागले आहे. थांबा, आता मला डायलॉग ऐकू येतोय. ‘एक चुटकी सिंदूर की किंमत’ ऐवजी ‘सव्वा रुपये की किंमत तुम क्या जानोे’ असा डायलॉग. माझ्या डोळ्यासमोर द़ृश्य आहे. डीजेवर रिमिक्स लागलेय. ‘धोतरेही पेटतील’च्या मुख्य सुरावर ‘मला माहिती नाही’चा कोरस आणि त्याला मध्येच ‘सव्वा रुपये की किंमत तुम क्या जानो’चा डायलॉग! काय म्हणता या रिमिक्स गाण्यात ‘ ‘लॉकडाऊन’ लावू का?’ असा पण डायलॉग हिट होईल? वा! वा!! मग आम्ही पण म्हणू ‘लावा रे ते रिमिक्स!’
जनतेच्या भल्याचे काही चालेना!
‘संयुक्त किसान मोर्चा’ अर्थात ‘अल्ला हो अकबर’चा नारा देत आंदोलन वगैरे करणारे राकेश टिकैत यांनी २७ तारखेला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. त्या ‘भारत बंद’साठी महाराष्ट्रामधून महाविकास आघाडीने समर्थन दिले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि शिवसेनेचे संजय राऊत यांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. आता यात नवल ते काय? जे जे बंद, जे जे स्थगित त्या सगळ्यांना त्यांचा पाठिंबा असतोच असतो. २०१९ पासून ते ‘बंद’चाच कारभार करतात. त्यांची ‘बंद’ची आवड पाहता नशिबानेही त्यांना जोरदार साथ दिली. मग काय? हे बंद! ते बंद!! आणि सगळेच बंद!!! बंद नाही, तर स्थगिती आहेच. हे सगळे ‘लॉकडाऊन’च्या आणि कोरोनाबाप्पाच्या नावाने करता येते. खरे म्हणजे, यांची इष्टदेवता कोरोनामाईच असावी. कारण, प्रत्येक अपयशाचे, अविकासाचे खापर कोरोनावर फोडले की झाले!

कोरोनाची भीती आहे. आपल्या महाराष्ट्रात तर केरळहून तिसरी लाट यायची वेळसुद्धा झाली होती. तर या अशाप्रसंगी राज्यात हिंदू समाजाच्या सणवाराचे दिवस सुरू झालेत. सत्तेतील राजकारण्यांचे भ्रष्टाचार स्प्रिंगसारखे वर उसळत आहेत. हा खरे म्हटले तर ‘लॉकडाऊन’साठी सुवर्णकाळ. तसाही महाराष्ट्रात उद्योगधंद्यांचे आणि सामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडणारा ‘लॉकडाऊन’ आहेच. पण, या सगळ्या व्यतिरिक्त आणखी काय केले म्हणजे महाराष्ट्राची जनता पुरती नामोहरम होईल, यासाठीचा अभ्यास केला जात असावा असे दिसते. त्यामुळेच टिकैतसारख्या महाराष्ट्राला खर्‍या अर्थाने उपर्‍या असलेल्या माणसाच्या ‘बंंद’ला महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या नेत्यांची लाचारी स्पष्ट झाली आहे. शेतकर्‍यांच्या नावाने चालणार्‍या आंदोलनामागे काय आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. शाहीनबाग आंदोलनाचे हे आंदोलन भावंड आहे. शाहीनबाग, कोरेगाव-भीमा वगैरे वगैरे आंदोलन मोर्चाची कुंडली लोकांसमोर आली आहे. या आंदोलनाला महाविकास आघाडी कोणत्या मुद्द्यावर पाठिंबा देते, हे मात्र विचारायचं नाही. कारण, आले महाविकास आघाडीच्या मना, तिथे जनतेच्या भल्याचे काही चालेना!







@@AUTHORINFO_V1@@