दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या जम्मू-काश्मीर सरकारमधील ६ कर्मचाऱ्यांचे निलंबन

    23-Sep-2021
Total Views |
jammu kashmir _1 &nb




काश्मीर -
जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत काम केल्याचा आरोप असलेल्या सहा कर्मचाऱ्यांवर राज्य सरकारने मोठी कारवाई करत त्यांना सेवेतून काढून टाकले आहे. हे कर्मचारी ओव्हर ग्राउंड कामगार म्हणून काम करत होते. बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये अनंतनाग येथील शिक्षक हमीद वाणी यांचा समावेश आहे. तो अल्लाह टायगर या दहशतवादी संघटनेचा जिल्हा कमांडर म्हणून काम करत होता.
 
 
 
जमात-ए-इस्लामी या दहशतवादी संघटनेने हमीद वाणाली सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत केली होती. असा आरोप आहे की, जेव्हा बुरहान वाणीला २०१६ मध्ये लष्कराने ठार केले होते. तेव्हा हमीद वाणीला काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या देशविरोधी कारवायांमध्ये मुख्य वक्ता म्हणून बोलावण्यात आले होते. यासोबतच राज्य सरकारने जफर हुसेन भट्ट यांना नोकरीतून बडतर्फ करण्याची कारवाई केली आहे. तो किश्तवाड जिल्ह्यातील रहिवासी आहे. जम्मूच्या रस्ते आणि बांधकाम विभागात कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले मोहम्मद रफी यांनाही काढून टाकण्यात आले आहे. तो किश्तवाडचा रहिवासी आहे. रफीवर किश्तवाडमधील हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांना गुन्हे करण्यासाठी जागा पुरवल्याचा आरोप आहे. त्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटकही केली आहे. त्याच्याविरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.
 
 
 
या प्रकरणात, काही काळापूर्वी राज्य सरकारने राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेऊन एक आदेश जारी केला होता. त्यानुसार देशद्रोही घटकांना समर्थन देणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यास सांगितले होते. आदेशात असे म्हटले आहे की, जर कोणताही कर्मचारी, जाणूनबुजून किंवा चुकून, देशद्रोही घटक किंवा परकीय शक्तींना पाठिंबा देत असल्याचे आढळले, तर त्याला बडतर्फ केले जाईल. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.