कुशल कार्यकर्ता घडविणारा दीपस्तंभ हरपला

    21-Sep-2021
Total Views |

vividh 2_1  H x
कमलाकर सांरगधर बेडेकर म्हणजे समाजशील व्यक्तींसाठी अखंड प्रेरणादायी चालते बोलते व्यक्तिमत्त्व. त्यांच्या प्रत्येक कृतीतून काहीना काही शिकण्यासारखे असायचे. शिस्त, संघटन आणि वेळेचे नियोजन करून प्रत्यक्ष कार्य कसे करावे, यासाठीचा वस्तुपाठ घालून द्यावा तो त्यांनीच. दि. २५ ऑगस्ट रोजी त्यांना देवाज्ञा झाली. त्यांच्या स्वभावाचे आणि कार्यशैलीचे असंख्य पैलू डोळ्यासमोर आले. त्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
मुंबईमधील संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि वनवासी कल्याण आश्रमाचे मुंबई महानगराचे पूर्व सचिव कमलाकर सारंगधर बेडेकर, मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरी करत असताना वनवासी कल्याण आश्रमात छोटेसे रोपटे लावले. आज त्या रोपट्याचा हळूहळू वटवृक्ष झाला. वनवासी मित्र मंडळाचे संस्थापक तेव्हापासून बेडेकरजींची ओळख, स्पष्टवक्तेपणा हा विशेष गुण, मृदू आवाज, हसरा चेहरा, मृदू वाणीमुळे बरेचसे कार्यकर्ते आकर्षित झाले.कमलाकर सांरगधर बेडेकर म्हणजे समाजशील व्यक्तींसाठी अखंड प्रेरणादायी चालते बोलते व्यक्तिमत्त्व. त्यांच्या प्रत्येक कृतीतून काहीना काही शिकण्यासारखे असायचे. शिस्त, संघटन आणि वेळेचे नियोजन करून प्रत्यक्ष कार्य कसे करावे, यासाठीचा वस्तुपाठ घालून द्यावा तो त्यांनीच. दि. २५ ऑगस्ट रोजी त्यांना देवाज्ञा झाली. त्यांच्या स्वभावाचे आणि कार्यशैलीचे असंख्य पैलू डोळ्यासमोर आले. त्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
निधी संकलन हा बेडेकरजींचा आवडीचा विषय होता. पितृपक्ष असो, सामाजिक कार्यक्रम असो, पूजा असो अथक परिश्रम करणारा कार्यकर्ता तसेच अनेक समस्या सोडविण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून काम करायचे, हे नेहमी सांगत असत. वनवासी शहरवासी मिलाप, मुंबई दर्शन असो, खेळखुद कार्यक्रम असो, बेडेकर आवर्जून कार्यक्रमाला हजर असत. कमलाकर बेडेकर यांचे कार्य मात्र एवढ्या पुरते सीमित राहत नाही. माणगाव शाळेची उभारणी ही त्यांच्या कारकिर्दीत झाली. शनिवार, रविवार कुशल कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन शाळेचे काम पूर्ण केले. त्यासाठी ते एसटी बसने ही प्रवास करीत असत. त्यांच्याच जिद्दीमुळे व सर्वांच्या मदतीने माणगाव शाळा उभी राहिली.
प्रसन्न व्यक्तिमत्त्व स्पष्टवक्तेपणा, गुणग्राह्यता असे अगणित पैलू एकाच व्यक्तीच्या अंगी असणे दुर्मीळ असते. हे कमलाकर बेडेकरांच्या रुपाने वनवासी कल्याण आश्रमाने अनुभवले आहे. २५ ऑगस्ट रोजी देवाज्ञा झाली. त्याचे आदर्श व्यक्तिमत्त्व आजच्या तरुण पिढीसाठी एक दीपस्तंभ आहे. त्यांच्या महान कार्याला ही शब्दसुमनांची आदरांजली!

हेमंत वरळीकर