नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील अमेठी येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्रातील कुस्तीपटूंनी अनोखी कामगिरी केली आहे. महाराष्ट्रातील कुस्तीपटूंनी ३ दिवसीय झालेल्या या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत २ सुवर्ण पदक , २ रौप्य पदक व ५ कांस्य पटकावून आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. यामध्ये सोलापूरच्या सौरव इगवे आणि पुण्याच्या सुरज कोकाटेने सुवर्ण पदके पटकावली आहेत.
रविवारी पार पडलेल्या पुरुष फ्री-स्टाईल कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या सुरज कोकाटे ६१किलो वजनी गटात जुनियर वर्ल्ड रौप्य विजेता सेना दलातील रविंदरला ९- ८ अशा गुणफरकाने हरवून चित्तथराक सामन्यात सुवर्ण पदक पटकावले . तसेच पुण्याचा आदर्श गुंड याने राजस्थान, चंदीगडच्या पैलवानांना हरवून रौप्य पदक पटकावले. तसेच, सुरज कोकाटे आणि सौरभ इगवे यांची सायबेरिया येथे होणाऱ्या २३ वर्षांखालील जागतिक स्पर्धेसाठी थेट निवड झाली आहे. या सर्व पदक विजेत्यांचे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने शुभेच्छा दिल्या आहेत.
अशी आहे पदके जिंकणाऱ्यांची यादी
फ्री- स्टाईल :- ५७ किलो - सुवर्ण पदक
पै. सौरव इगवे ( सोलापूर ) आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे
फ्री- स्टाईल :- ६१किलो - सुवर्ण पदक
पै. सुरज कोकाटे ( पुणे ) आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे
फ्री- स्टाईल :- ६५ किलो - रौप्य पदक
पै. सौरभ पाटील ( कोल्हापूर ) वीर हनुमान तालीम ,राशिवडे ता. राधानगरी
फ्री- स्टाईल :- ७९ किलो - कांस्य पदक
पै. समीर शेख ( सोलापूर ) हनुमान आखाडा पुणे
फ्री- स्टाईल :- १२५ किलो - कांस्य पदक
पै. आदर्श गुंड ( पुणे ) जोग व्यायाम शाळा , देवाची आळंदी पुणे
ग्रीको - रोमन :- ७७ किलो - कांस्य पदक
पै. गोकुळ यादव ( मुंबई ) जोगेश्वरी कुस्ती आखाडा
महिला :- ५३ किलो : कांस्य पदक
स्वाती शिंदे ( कोल्हापूर ) सदाशिव राव मंडलिक कुस्ती केंद्र , मुरगूड ता. कागल
महिला :- ५९ किलो : रौप्य पदक
भाग्यश्री फंड ( अ . नगर ) इंटरनॅशनल कुस्ती संकुल श्रीगोंदा
महिला :- ६२ किलो : कांस्य पदक
सोनाली मंडलिक ( अ . नगर ) इंटरनॅशनल कुस्ती संकुल श्रीगोंदा