इस्लामविरोधी म्हणत IPL प्रसारणावर आणली बंदी!

नाचणाऱ्या चीअर लीडर आणि डोकं न झाकता महिलांची उपस्थितीमुळे अफगानिस्तानमध्ये चुकीचा संदेश

    20-Sep-2021
Total Views |

IPL 2021_1  H x
 
 


नवी दिल्ली : नुकतेच आयपीएल २०२१चा दुसरा भाग सुरु झाला. बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने ही स्पर्धा मध्येच स्तगीत करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा आयपीएलचा रणसंग्राम सुरु झाला आहे. अफगानिस्तानचे खेळाडू मोहम्मद नबी आणि राशीद खान हेदेखील प्रसिद्ध आहेत. मात्र, दुर्दैवाने आता त्यांच्याच देशात आयपीएल २०२१च्या प्रसारणावर बंदी आणली आहे. तालिबानने हा निर्णय घेतला असून याबद्दल अफगानिस्तांच्या एका वरिष्ठ पत्रकाराने पुष्टी केली आहे. आयपीएल हे इस्लामविरोधी असल्याचे सांगत तालिबानने आयपीएलच्या अफगाणिस्तानातील प्रसारणावर बंदी आणली आहे.

 
 
 
 

 
तालिबानचे म्हणणे आहे की, "आयपीएलमध्ये गैर-इस्लामिक गोष्टी आहेत. सामन्यांदरम्यान नाचणाऱ्या चीअर लीडर्स आणि स्टेडियममध्ये डोके न झाकता महिलांची उपस्थिती य्सार्व गोष्टी गैर-इस्लामिक आहेत. अफगाणिस्तानला कोणताही चुकीचा संदेश पाठवू इच्छित नाही." अफगाणिस्तानातील ज्येष्ठ पत्रकारांनी याला दुजोरा दिला आहे. त्यांनी लिहिले की, अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय टीव्ही आणि रेडिओवर आयपीएल सामन्यांचे कोणतेही प्रसारण होणार नाही.
 
 
 
आयपीएलमध्ये रशिद खान आणि मोहम्मद नबीसारखे अफगाणिस्तानी क्रिकेटपटू स्टार खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहेत. जेव्हा तालिबानने अफगानिस्तांवर ताबा मिळवला, तेव्हा दोघेही देशाबाहेर होते. त्यानंतर तालिबानने देशाच्या क्रिकेटमध्ये कुठलीही ढवळाढवळ करणार नाही असे आश्वासनही दिले होते. तालिबानने अफगाणिस्तानमध्ये प्रसारणावर बंदी घातल्याने राशिद खान आणि मोहम्मद नबी यांना खूप दुःख झाले आहे. कारण त्यांचे चाहते त्यांचा सामना पाहू शकणार नाहीत. याआधी त्यांनी अफगानिस्तानच्या महिला संघाबाबत ठोस निर्णय घेतला नसून त्यांच्यावर बंदी घातल्याचे सांगण्यात येत आहे.