बाईकप्रेमींचा हिरमोड 'हिरो'च्या १८ दुचाकी महागल्या

आजपासून नव्या किमती लागू, सर्वात स्वस्त एचएफ100 हजार रुपयांनी महाग

    20-Sep-2021
Total Views |


Hero_1  H x W:


मुंबई : हीरो मोटोकॉर्पतर्फे सर्व दुचाकी एक्स-शोरूमची किंमत हजार ते तीन हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे. नव्या किंमती दि. २० सप्टेंबरपासून लागू करण्यात आल्या. आता हिरोच्या बाईक आणि स्कुटर खरेदी करण्यासाठी आता बजेट वाढविण्याची गरज आहे. कच्चा माल आणि सुटे भागांच्या किंमती वाढल्याने ही वाढ केल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
 
 
हीरोची सर्वात स्वस्त बाईक एचएफ100 ची एक्स शो रुम किंमत ४९ हजार ९०० रुपयांवरुन वाढून ५० हजारांवरून ९०० रुपयांवर पोहोचली आहे. या बाईकची ऑनरोड किंमत 60 हजार 137 रुपयांनी वाढून 61 हजार 224 रुपये झाली आहे. देशभरात या कंपनीचे एकूण दहा कोटींहून अधिक ग्राहक आहेत.
 
हिरो मोटोकॉर्प कंपनीने जानेवारी २०२१ ते सप्टेंबर २०२१ पर्यंत नऊ महिन्यांत चार ही किंमत वाढण्यात आली आहे. यापूर्वी जुलैमध्ये कंपनीने तीन हजार रुपयांपर्यंत किंमती वाढविल्या होत्या. तर दोनदा अनुक्रमे दीड ते अडीच हजार रुपयांपर्यंत किंमती वाढविण्यात आल्या आहेत.
 
कंपनीने आता दुचाकीच्या नव्या किंमतींची यादी जाहीर केली आहे. भारतात हीरोचे एकूण १८ मॉडेल्स आहेत. ज्यात १३ बाईक्स आणि पाच स्कुटर्स आहेत. सरासरी एकूण तीन हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, अद्याप कुठल्या मॉडेलवर तीन हजारांची वाढ करण्यात येणार आहे याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही.
 
सर्वात महागडी असणारी दुचाकी एक्सट्रीम 200S आहे. सुरुवातीला त्याची किंमत 1,24,014 रुपये इतकी आहे. त्याच प्रमाणे कंपनीची सर्वात स्वस्त स्कूटर प्लेझर प्लस आहे. ज्याची सुरुवात ६० हजार ५०० रुपयांपर्यंत आहे. न्यू मेस्ट्रो एज १२५ सर्वात महागडी स्कुटर आहे. ज्याची सुरुवातीची किंमत ७२ हजार २५० रुपये इतकी आहे. यात आता तीन हजारांची वाढ झाली आहे.
 
 
किंमती महाग तरीही देशातील सर्वात अव्वल कंपनी
 
 
हीरो ही देशातील क्रमांक एकची टू-व्हीलर कंपनी आहे. गेल्या काही वर्षांपासून हे स्थान कंपनीने कायम राखले आहे. दरम्यान, कोरोना महामारीतही या कंपनीने भांडवली बाजारात आपले स्थान कायम ठेवले आहे. गेल्या पाच महिन्यांत कंपनीचा शेअर सर्वात जास्त ४६.९८ टक्के आणि ऑगस्टमध्ये सर्वात कमी ३२.०८ टक्के इतका होता. पाच महिन्यांत सरासरी तो ३८ टक्के इतका झाला.