सर्वाधिक श्रीमंत यादीत बेजोस जगात, तर अंबानी आशियात प्रथम

बेजोस २०० डॉलर्ससह जगात तर ६.५५ अब्ज डॉलर संपत्तीसह अंबानी आशियात प्रथम

    02-Sep-2021
Total Views |

Amazon _1  H x


नवी दिल्ली : आशिायातील धनाढ्य व्यक्तींच्या यादीत रिलायन्सचे मुकेश अंबानी पहिले आणि अदानी समुहाचे गौतम अदानींचा दुसरा क्रमांक आला आहे. अदानी जगात १४व्या क्रमांकाचे व्यावसायिक ठरले आहेत. तर अंबानींचा क्रमांक जगात १२वा आहे. 'ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्स'तर्फे १ सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली. 

या अहवालानुसार, अॅमेझॉनचे जेफ बेजोस हे जगात पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती २०० अब्ज डॉलर्स इतकी आहे. टेस्लाचे एलन मस्क १९९ डॉलर्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अब्जाधिशांच्या यादीत मुकेश अंबानींची संपत्ती ६.५५ लाख कोटी रुपये इतकी आहे. गौतम अदानींची संपत्ती ५.२४ लाख कोटी रुपये इतकी आहे.

अंबानींची रँकींग अदानींपेक्षा पुढे असली तरीही संपत्ती कमाविण्यात त्यांनी अंबानींना मागे टाकले आहे. अदानी समुहाच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आल्याने ही वाढ झाली आहे. अदानी पावर, अदानी गॅस, अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्समध्ये गेल्या दहा दिवसांपासून तेजी दिसून आली. अदानी ट्रान्समिशनचा शेअर दररोज पाच टक्क्यांच्या अप्पर सर्कीटसह बंद झाला आहे. गुरुवारी एक वर्षांतील उच्चांक गाठला होता. गुरुवारी हा शेअर १,७३५ रुपयांपर्यंत गेला आहे या पूर्वी हा रेकॉर्ड १६८२ रुपये होता.