रत्नागिरी : गणपतीपुळे येथे समुद्रात आंघोळीसाठी गेलेल्या सांगलीतील चारपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला. अन्य तिघांना बुडताना वाचविण्यात यश आले. प्रणेश मुकुंद वसगडेकर (वय २३, रा. सांगली), असे मृताचे नाव आहे. ओमकार उत्तम मेहत्तर (वय २६, रा. कोल्हापूर), वैभव जगताप ( वय २५, रा. सांगली) आणि पृथ्वीराज पाटील ( वय २४, रा. सांगली), अशी वाचविण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. गुरुवारी ते आंघोळ करण्यासाठी गणपती मंदिराजवळील समुद्रात गेले. परंतू पाण्याचा अंदाज न आल्याने प्रणेश बुडू लागला. वाचविण्यासाठी आरडाओरडा केल्यानंतर तिथल्या जीवरक्षकांनी त्याला वाचविले.