मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरणी अटकेत असलेला आरोपी मोहन चौहान याने अखेर पोलिसांसमोर आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना पत्रकार परिषद घेत दिली. तसेच, आरोपीने गुन्हा करताना कोणत्या शस्त्राचा वापर केला? गुन्हा कसा घडला? यापारकरणी सर्व कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. तसेच, या प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हादेखील दाखल करण्यात आला असलायचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले.
मुंबईचे पोलीस आयुक्त नगराळे यांनी सांगितले की, "आरोपीला सध्या २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात सबळ पुरावे मिळाले आहेत. गुन्हा कसा घडला? याचा घटनाक्रम पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाला आहे. येत्या महिनाभरात किंवा त्याआधी संपूर्ण प्रकरणाचा तपास पूर्ण केला जाईल."
पुढे त्यांनी संगितले की, "राष्ट्रीय महिला आयोगच्या सदस्या चंद्रमुखी आणि अरुण हलदर यांनीदेखील भेट देऊन चर्चा केली. तसेच सोमवारी १.३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि इतर अधिकाऱ्यांची सह्याद्री येथे बैठक झाली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीडितेच्या कुटुंबियांना २० लाखांची मदत जाहीर केली आहे,"