मुंबई : दिल्लीमध्ये २०१२ मध्ये घडलेल्या 'निर्भया'ची पुनरावृत्ती शुक्रवारी मुंबईमध्ये घडली. ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात लोखंडी रॉड घालण्याचे क्रूर काम या नराधमाने केले. सध्या तिची प्रकृती चिंताजनक असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. यावरून आता भाजपने महाराष्ट्र सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
"महाराष्ट्रामध्ये महिला आणि मुलीवर अत्याचाराचे सत्र थांब नाही आहे. बुधवारी १४ जणांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. गुरुवारीही अपल्वयीन मुलीवर बलात्कार झाला आणि शुक्रवारी मुंबईत साकीनाक्यामध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार झाला. या प्रकरणात पोलिसांनी एक आरोपीला पकडल्याची माहिती दिली आहे. पण राजावाडीच्या डॉक्टरांनी जे सांगितले, ते जास्त गंभीर आहे" असे चित्रा वाघ म्हणाल्या. "दिल्लीच्या निर्भयासारखे हे प्रकरण आहे. नक्कीच यात एकपेक्षा जास्त गुन्हेगार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी एकाला अटक केली. पण मला खात्री आहे, पुढच्या काही दिवसात अजून नावे पुढे येतील" असेही त्या म्हणाल्या.
मुंबईतील कांदीवली येथील खैरानी रोड येथे ही क्रूर घटना घडली. या प्रकरणात ४५ वर्षीय मोहन चौहानला अटक करण्यात आली आहे. चौहान याने एका टेम्पोमध्ये ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार केला. एक व्यक्ती महिलेला मारहाण करत असल्याचा फोन पोलिस नियंत्रण कक्षाला पहाटेच्या सुमारास करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. तिला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
प्राथमिक तपासात तिच्यावर बलात्कार झाल्याचे आणि गुप्तांगात लोखंडी रॉड घालण्यात आल्याचे आढळले. संबंधित टेम्पोमध्येही रक्त आढळले आहे. संबंधित महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या संदर्भात काही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चौहानला अटक केली. त्याच्यावर बलात्कार आणि खुनाच्या प्रयत्नाचे कलम लावण्यात आले आहे.