राज्यसरकार, महिला सुरक्षा विषयात अपयशी : प्रेरणा पवार

राज्यसरकार, महिला सुरक्षा विषयात अपयशी : प्रेरणा पवार

    11-Sep-2021
Total Views |

Maharashtra_1  
 
मुंबई : ऐन गणेशोस्तवात मुंबईमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. दिल्लीप्रमाणे मुंबईत एक निर्भय प्रकरण समोर आले. शनिवारी साकीनाका बलात्कार पिडीतेचा राजावाडी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणावर आता विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात गेल्या ३ दिवसांमध्ये घडलेली ही चौथी घटना होती. यावर अभाविप कोंकण प्रदेश मंत्री प्रेरणा पवार यांनीदेखील राज्य सरकारवर टीका केली आहे.
 
 
"महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसांत तब्बल ४ बलात्काराच्या घटना समोर आल्या. यातील ३ घटना पुण्यातील तर आज साकीनाका मुंबई येथे ३५ वर्षीय महिलेवर क्रूर अत्याचार केल्याची घटना समोर आली. अभाविप कोंकण प्रदेश या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करते. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला वेग द्यावा व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी." अशी मागणी प्रेरणा पवार यांनी केली.
 
 
पुढे प्रेरणा पवार म्हणाल्या की, "राज्यात महिला अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. राज्यसरकार महिला सुरक्षेच्या विषयामध्ये अपयशी ठरले आहे. सध्या राज्याची परिस्थिती अतिशय चिंताजनक असून साकीनाका येथे घडलेली घटना दिल्ली येथील निर्भया प्रकरणाची आठवण करून देणारी आहे. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ शोधून फाशीची शिक्षा देण्यात यावी '' असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
 
 
''साकीनाका मुंबई येथे ३५ वर्षीय महिलेवर झालेला क्रूर अत्याचार हा अतिशय निंदनीय आहे. ज्या मुंबईला महिलांसाठी सर्वाधिक सुरक्षित म्हटले जात होते, आज त्याच मुंबईमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडते, हे दुर्देवी आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी वेगाने तपास करून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी.'' असे मत अभाविप मुंबई महानगर मंत्री गौतमी अहिरराव यांनी व्यक्त केले.