साक्री : राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे साक्री डेपोचे वाहक कमलाकर बेंडसे यांना आत्महत्या करावी लागली. राज्यातील एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येची ही तिसरी घटना आहे. आपल्या खात्यातील कर्मचारी आत्महत्या करतात मंत्री अनिल परब यांना झोप कशी येते, असा प्रश्न भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विचारला आहे.
अशा मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. चित्रा वाघ यांनी बुधवारी बेंडसे कुटूंबियांची भेट घेतली. "बेडसेंच्या मुलाचं पालकत्व शासनाने स्वीकारत मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यावी. तसेच पत्नींला मान्य केल्याप्रमाणे तात्काळ नोकरीत सामावून घ्यावे.", असेही त्या म्हणाल्या. साक्रीतील बेडसे कुटूंबाची भेट घेत त्यांनी कुटूंबियांचे सांत्वन केले. भाजप संपूर्ण कुटूंबाच्या पाठीशी आहे, अशा भावनाही कुटूंबियांपुढे व्यक्त केल्या.