शिवसेना लोकप्रतिनिधींच्या लालडोंगरीत पुनर्विकासाच्या नावाने अंधकारच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2021   
Total Views |

slum_1  H x W:
 
७५० कुटुंब १४ वर्षांपासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत;विकासकांच्या प्रतिनिधींची नागरिकांमध्ये दहशत

मुंबई : चेंबूरमधील लालडोंगरी परिसरात मागील अनेक वर्षांपासून पुनर्विकासाच्या नावाखाली दुर्गतीचा अंधकार पसरला आहे. मागील १४ वर्षांपासून येथील स्थानिक ७५० कुटुंबेपुनर्विकासाच्या माध्यमातून घर मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, शिवसेनेचे लोकप्रतिनिधी असलेल्या डोंगरी भागात विकासाच्या नावाने मात्र अंधकारच अनुभवायला मिळत आहे, अशी भावना स्थानिक डोंगरीकर रहिवासी व्यक्त करत आहेत.
 
चेंबूरमधील लालडोंगरी भागात २००७ साली ‘एसआरए’अंतर्गत पुनर्विकास प्रकल्प सुरू झाला होता. नुकतीच संबंधित विकासकाने स्थानिक ७५० रहिवाशांची निवासाची सोय एका २३ माळ्यांच्या इमारतीमध्ये केली आहे. मात्र, इमारतीत अनेक मूलभूत सुविधांची वानवा आहे, अशी तक्रार नागरिक करत आहेत. इमारतीत पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची स्वतंत्र ड्रेनेज व्यवस्था नाही. या इमारतीतील ७५० कुटुंबांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. ड्रेनेज व्यवस्था नसल्याने या इमारतीतील शौचालयातील सर्वच घाण रस्त्यावर येते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, सदर इमारतीला महानगरपालिका प्रशासनाने पाणी आणि ड्रेनेज व्यवस्था देण्याची परवानगीही नाकारली आहे, अशी दबक्या आवाजातील चर्चा आहे.
 
मागील पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “याच परिसरात विकासकाने दोन इमारती विक्रीसाठी बांधल्या आहेत. मात्र, आम्हा उर्वरित ७५० कुटुंबांसाठी विकासक कधी इमारत बांधणार? कधी घर मिळणार? घर मिळाले तरी पाणी आणि शौचालयाची अशीच दुर्दशा असेल तर नुसतेच घर मिळून त्याचा उपयोग काय? अशी आमची अडचण आहे.”
विकासकाच्या प्रतिनिधींचा दबाव
 
“आम्हाला असलेल्या समस्यांविषयी आम्ही विकासकाशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, विकासक आम्हाला भेटतच नाही. उलट त्यांच्या प्रतिनिधींच्या दहशतीमुळे आमच्यात भीती निर्माण झाली आहे. लालडोंगरी चेंबूरच्या कष्टकरी मराठमोळ्या जनतेला त्यांचे हक्काचे घर मिळवून देण्यास इथले शिवसेनेचे लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत,“ अशा शब्दांत स्थानिक नागरिक आपला संताप व्यक्त करत आहेत.
“माझे स्वत:चे घर आणि दुकान या प्रकल्पामध्ये गेले आहे. मी २००७ सालापासून घर मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. आमच्या सोबतच्या ७५० जणांना घर मिळाले. पण, पाणी आणि शौचालयाची व्यवस्था पाहून इथल्या शिवसेना नगरसेवक, आमदार, खासदार यांच्यापुढे हा प्रश्न मांडला. पण, प्रश्न सुटत नाही. उर्वरित ७५० कुटुंबीयांना हक्काचे घर कधी मिळणार? कारण विकासक तर विक्रीसाठी असलेल्या इमारतीच बांधताना दिसत आहे. आम्हाला हक्काचे घर मिळावे, यासाठी आम्ही सर्वस्तरावर प्रयत्न करत आहोत.“
 
शंकर कांबळे,

भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, अनुसूचित जाती मोर्चा









 
@@AUTHORINFO_V1@@