मोदींच्या सत्तेत सर्वाधिक पुरातन वस्तू परेदशातून भारतात परतला; परराष्ट्र संबधाचे यश

    06-Aug-2021
Total Views |
modi _1  H x W:
दिल्ली - २०१४ मध्ये केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर परदेशातून ४१ पुरातन कलाकृती भारतात परत आणण्यात आल्या आहेत. केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री जी.किशन रेड्डी यांनी गुरुवारी (5 ऑगस्ट 2021) संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.
 
 
 
राज्यसभेत एका लेखी उत्तरात केंद्रीय मंत्री म्हणाले की, १९७६ पासून आतापर्यंत एकूण ५४ पुरातन वस्तू परदेशातून परत आणण्यात आल्या आहे. त्यापैकी ४१ वस्तू या पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतात परत आणण्यात आल्या आहेत. रेड्डी म्हणाले, “ही अभिमानाची गोष्ट आहे की, देशातून चोरी करून परदेशात पाठवलेल्या आपल्या वारसा वस्तू परत आणण्यास आपण सक्षम आहोत. गेल्या सात वर्षांमध्ये भारतात पुन्हा आणलेल्या पुरातन वस्तूंची संख्या आतापर्यंतची सर्वाधिक आहे. २०१४ पासून भारताने ४१ वारसा वस्तू परत आणल्या आहेत, जे एकूण वस्तूंच्या ७५ टक्क्यांहून अधिक आहेत.
 
 
 
या यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देताना ते म्हणाले की, "माझा विश्वास आहे की हे यश आपल्या सांस्कृतिक संबंधांमधील स्थिर सुधारणामुळे आलेले आहे. जे पंतप्रधानांच्या विविध राष्ट्रप्रमुखांशी जवळच्या वैयक्तिक संबंधांमुळे शक्य झाले आहे." रेड्डी यांनी एएसआय, सीबीआय सारख्या विविध सरकारी संस्थांच्या अथक प्रयत्नांचे कौतुक केले. आठवड्यापूर्वी, ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय गॅलरीने सांस्कृतिक महत्त्व असलेल्या १४ कलाकृती भारत सरकारला परत करण्याचा निर्णय घेतला होता. ज्यामध्ये सहा कांस्य किंवा दगडाची शिल्पे, एक पितळ मिरवणुकीचे मानक, एक पेंट केलेले स्क्रोल आणि सहा छायाचित्रे यांचा समावेश आहे. हा संग्रह सुमारे $ 2.2 दशलक्ष (सुमारे 16.34 कोटी रुपये) आहे. यातील काही कलाकृती 12 व्या शतकातील आहेत. नॅशनल गॅलरी ऑस्ट्रेलिया (एनजीए) चे संचालक म्हणाले होते, "ही एक सांस्कृतिक जबाबदारी आहे आणि ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील परस्पर सहकार्याचा परिणाम आहे."