भारतात एकूण ४ लाख, ४ हजार, ९५८ रुग्णांवर उपचार सुरू

    04-Aug-2021
Total Views |

covid 19 _1  H




नवी दिल्ली
: गेल्या २४ तासांत ३८ हजार, ८८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ९७.३८ टक्के आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी, ८ लाख, ९६ हजार, ३५४ जण कोरोनातून बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत भारतामध्ये ३० हजार, ५४९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून सध्या भारतात ४ लाख, ४ हजार, ९५८ रुग्ण उपचाराधीन आहेत. उपचाराधीन रुग्ण एकूण रुग्णसंख्येच्या १.२८ टक्के आहेत.
साप्ताहिक ‘पॉझिटिव्हिटी’ दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असून हा दर सध्या २.३९ टक्के, तर दैनंदिन ‘पॉझिटिव्हिटी’ दर १.८५ टक्के आहे. चाचणी क्षमतेत उल्लेखनीय वाढ झाली असून एकूण ४७.१२ कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत. सर्व स्रोतांद्वारे राज्य/केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत लसीच्या ४९.८५ कोटींहून अधिक मात्रा पुरविण्यात आल्या आहेत आणि आणखी २० लाख, ९४ हजार, ८९० मात्रा उपलब्ध होण्याच्या मार्गावर आहेत. यापैकी अपव्यय झालेल्या मात्रांसह एकूण ४७ कोटी, ५२ लाख, ४९ हजार, ५५४ मात्रांचा वापर करण्यात आला आहे. राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप २.७५ कोटींपेक्षा जास्त मात्रा लसीकरणासाठी शिल्लक आहेत.