मुंबईच्या हवेत ऊर्जा व वाहतूक क्षेत्राचे कार्बन उत्सर्जन धोका-पातळीच्या पलीकडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Aug-2021   
Total Views |
polution_1  H x 
 
 
 
 मुंबईच्या वाहतुकीतून हवेत सोडल्या जाणार्‍या ‘पीएम’ २.५ (२.५ ‘मायक्रॉन’ व्यासाचा घातक सूक्ष्मकण) प्रमाण गेल्या चार वर्षांत दुप्पट झाले आहे. त्यामुळे वाहतूक हा मोठा प्रदूषणाचा स्रोत बनला आहे. पुणे येथील ‘सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी वेदर फोरकास्टिंग अ‍ॅण्ड रिसर्च’ (एसएएफएआर) सस्थेने ‘पीएम’ २.५ या स्रोताचे विश्लेषण केले आहे. त्यानुसार २०१६-१७ या वर्षीच्या वाहतूक क्षेत्राच्या उत्सर्जनाचा १६ टक्के वाटा २०१९-२० साली ३०.५ टक्क्यांवर गेला.
 
 
 
मुंबई महापालिका, सरकारी यंत्रणा आणि खासगी कंपन्यांनी मिळून २०१० ते २०२०च्या दरम्यान वाहतूक, घनकचरा, ऊर्जा आणि इतर क्षेत्रातून होणार्‍या कार्बन उत्सर्जनाची व्याप्ती किती झाली, यासंबंधी आकडेवारीमध्ये नोंद घेतली आहे. त्या आकडेवारीनुसार मुंबई महानगरात ‘कार्बन डायऑक्साईड’चे एकूण प्रमाण ३४.३ दशलक्ष टन झालेले आहे. २०२० हे साल कोरोनाकाळात गेले असल्यामुळे तौलनिक अभ्यासाकरिता २०१९ हे वर्ष आधारभूत मानण्यात आले आहे. २०१९च्या आकडेवारीनुसार मुंबईत दरडोई २.६७ टन इतका ‘कार्बन डायऑक्साईड’चा वाटा आहे. आपल्या देशाचा सरासरी वाटा दरडोई १.९१ टन इतका आहे. ऊर्जा क्षेत्राकडून उत्सर्जित होणारे हरितगृह वायूचे प्रमाण हे सर्वाधिक म्हणजे ७१ टक्के आहे. वाहतूक क्षेत्राचा वाटा २४ टक्के व घनकचरा व्यवस्थापनाचा वाटा पाच टक्के आहे.
 
  
मुंबईच्या हवा, पाणी, जमीन व प्रदूषण इत्यादींचा अभ्यास करणार्‍या पहिल्या कृती आराखड्याचा शुभारंभ अलीकडेच मुंबई महापालिकेत करण्यात आला. डिसेंबर २०२०मध्ये मुंबई ‘सी-४०’ क्लायमेंट चेंज शहर गटामध्ये सहभागी झाली आहे. ‘सी-४०’च्या निकषानुसार व मार्गदर्शक तत्त्वे यांना अनुसरून मुंबई महापालिका, ‘वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट’ (डब्ल्यूआरआय) यांच्या तांत्रिक सहकार्याने हा आराखडा बनविला जात आहे.ऊर्जा क्षेत्राचा वाटा सर्वात जास्तीचा आहे ही गोष्ट आश्चर्यकारक वाटणार नाही, कारण घरगुती व इतर ऊर्जावापराची व्याप्ती ही ९५ टक्के कोळसाव्याप्त विजेवर चालणारी आहे म्हणून तिचे प्रमाण ७१ टक्के आढळते. यात ५५ टक्के हा निवासी, ४१ टक्के व्यापारविषयक व इतर संस्थांचा आणि चार टक्के औद्योगिक वापर आहे. हरितगृह वायूच्या उत्सर्जन करणार्‍या ऊर्जा क्षेत्राचे ‘कार्बन डायऑक्साईड’चे प्रमाण २४.२ दशलक्ष टन, वाहतूक क्षेत्राचे प्रमाण २४ टक्के, इतर गोष्टींचे प्रमाण पाच टक्के आहे. वाहतूक (ट्रान्सपोर्ट) क्षेत्रातील विमानवाहतूक क्षेत्राचे प्रमाण ४५ टक्के, रस्तावाहतूक क्षेत्राचे प्रमाण ४४ टक्के, रेल्वेचे प्रमाण नऊ टक्के व जलमार्गाचे प्रमाण दोन टक्के कार्बन उत्सर्जनाचे आहे.
         
जीवाश्म इंधनजन्य प्रदूषणाचा जगाला विळखा
 
जीवाश्म इंधनामुळे निर्माण झालेल्या प्रदूषणामुळे जगाला फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे. अशा वायुप्रदूषणामुळे दररोज आठ अब्ज अमेरिकन डॉलरचे नुकसान होते. हे नुकसान जागतिक ‘जीडीपी’च्या ३.३ टक्के आहे, असा धक्कादायक निष्कर्ष ‘सीआरईए’ व ‘ग्रीन पीस’ या संस्थांच्या अहवालात काढण्यात आला आहे. अशा प्रदूषणामुळे भारतातही दरवर्षी १०.७ लाख कोटी रुपयांचे नुकसान होते.कोळसा, नैसर्गिक वायू व पेट्रोलजन्य पदार्थ आदि जीवाश्म इंधनाचे पदार्थ मानले जातात. पृथ्वीच्या पोटातील कार्बन संयुगेही जीवाश्म इंधनाची उदाहरणे आहेत. जीवाश्म इंधनाच्या प्रदूषणात अमेरिका, चीन व भारत देश आघाडीवर आहेत. या प्रदूषणामुळे या देशांना अनुक्रमे ९०० अब्ज, ६०० अब्ज व १५० अब्ज अमेरिकी डॉलरचे नुकसान होत आहे. या प्रकारच्या इंधनातून फेकले गेलेले प्रदूषित छोटे कण जगभरात दरवर्षी सुमारे ४५ लाख अपमृत्यूस (हृदयविकार, स्ट्रोक, फुप्फुसाचा कॅन्सर, श्वसनमार्गात संसर्ग इत्यादी रोगास) कारणीभूत ठरतात. यातील चीनमध्ये १८ लाख व भारतात दहा लाख अपमृत्यू होतात, असे निरीक्षण-अहवालात लिहिलेले आहे.
 
वाहनांमुळे होणारे वायुप्रदूषण गेल्या चार वर्षांत जवळपास दुप्पट झाले आहे.
 
मुंबईच्या वाहतुकीतून हवेत सोडल्या जाणार्‍या ‘पीएम’ २.५ (२.५ ‘मायक्रॉन’ व्यासाचा घातक सूक्ष्मकण) प्रमाण गेल्या चार वर्षांत दुप्पट झाले आहे. त्यामुळे वाहतूक हा मोठा प्रदूषणाचा स्रोत बनला आहे. पुणे येथील ‘सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी वेदर फोरकास्टिंग अ‍ॅण्ड रिसर्च’ (एसएएफएआर) सस्थेने ‘पीएम’ २.५ या स्रोताचे विश्लेषण केले आहे. त्यानुसार २०१६-१७ या वर्षीच्या वाहतूक क्षेत्राच्या उत्सर्जनाचा १६ टक्के वाटा २०१९-२० साली ३०.५ टक्क्यांवर गेला. परंतु, इतर स्रोतांमधून होणार्‍या उत्सर्जनात घट दिसत आहे. २०१६-१७ सालच्या उद्योग व वीजनिर्मिती क्षेत्रातून, घरगुती ज्वलनातून आणि वार्‍याने उडालेल्या धुळीकणातून अनुक्रमे ३६, २७ व २५ टक्के उत्सर्जन होत होते ते प्रमाण २०१९-२० साली अनुक्रमे १८, १५ व १५ टक्के दिसून आले. पालिकेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, शववहन, विमान वाहतूक, उदबत्ती, वीटभट्टी इत्यादीमधून २१.५ टक्के उत्सर्जन होते.
 
 
मुंबईत वाहनांची संख्या वाढली आहे, दिल्लीच्या तुलनेत मुंबईतील वाहनानी संपीडित नैसर्गिक वायू (सीएनजी) अंगीकार कमी प्रमाणात केला आहे. बहुसंख्य वाहने पेट्रोल व डिझेलवरच चालत आहेत, त्यामुळे वाहतुकीमुळे पीएम उत्सर्जनात वाढ दिसत आहे, असे सफरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व संस्थापक-संचालक डॉ. गुफरान बेग यांचे म्हणणे आहे. १९८२ सालच्या पर्यावरणाच्या अभ्यासानुसार मुंबईच्या वायुप्रदूषणाला परिवहन क्षेत्रच जबाबदार ठरले होते. यावरून खासगी वाहतूक अवलंबित्व कमी करण्याकरिता मेट्रो व उपनगरीय रेल्वे जास्त प्रमाणात आणणे हे ठरले, तरीपण गेल्या सुमारे ४० वर्षांत मुंबई क्षेत्राला प्रदूषण कमी करणे जमले नाही.
 
 
‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’मार्फत मुंबई महानगरक्षेत्रात वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी एका समितीचे गठन केले आहे. त्या समितीला ‘आरटीओ’च्या वायुवेग पथकाचीही मदत मिळणार आहे. एका कंपनीकडून वायुप्रदूषण यंत्रेही पुरविण्यात येणार आहेत. त्यानुसार वडाळा, अंधेरी, ताडदेव, बोरिवली, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, पनवेल, पेण, वसई ‘आरटीओ’कडून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. दिल्लीला जसा हवेच्या शुद्धीकरणासाठी ‘स्मॉग टॉवर’ उभारण्यात आला, तसा टॉवर मुंबईत उभारण्यात येईल का, असा विचार ‘एमपीसीबी’नी करायला हवा.
 
 
दिल्लीतील नवा ‘स्मॉग टॉवर’प्रदूषणकारी सूक्ष्म कण पकडणार्‍या पहिल्या ‘स्मॉग टॉवर’चे उद्घाटन दिल्लीतील कनॉट प्लेस येथे यावर्षीच्या २३ ऑगस्टला करण्यात आले. दुसरा टॉवर आनंद विहारला बसविला जाणार आहे. इतर देशासाठी वा शहरांकरिता हा टॉवर पथदर्शक प्रकल्प ठरू शकेल, असेही त्यावेळी सांगण्यात आले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यावेळी म्हणाले की, “२०१४ पासून ‘पीएम’ २.५ सूक्ष्म कणांची संहती दर घनमीटरला १५० मायक्रोग्रॅमपर्यंत खाली आली आहे, तर ‘पीएम’ दहा कणांची संहती ३०० मायक्रोग्रॅमवरून १५० मायक्रोग्रॅमपर्यंत खाली आली आहे.” देशातील हा पहिला ‘स्मॉग टॉवर’ म्हणजे प्रदूषण शोषक मनोरा आहे. हे तंत्रज्ञान अमेरिकेतून आयात केले आहे.
 
 
हा मनोरा प्रदूषक कण शोषून घेऊन शुद्ध हवा खालच्या बाजूने बाहेर सोडतो. सेकंदाला एक हजार घनमीटर हवा यात शुद्ध केली जाते. हे नवीन तंत्रज्ञान आहे व सध्या तरी प्रायोगिक तत्त्वावर त्याचा वापर होईल. ‘टाटा प्रोजेक्ट्स’नी हा टॉवर तयार केला आहे व त्यांना ‘आयआयटी’ मुंबई व दिल्ली यांनी सहकार्य केले आहे. २०१९मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ‘सीपीसीबी’ आणि दिल्ली सरकारला असे ‘स्मॉग टॉवर’ बसविण्याबद्दल आदेश दिले होते.‘स्मॉग टॉवर’चे घटक काय आहेत?हा मनोरा २४ मी. उंच आहे. खालची १८ मी. उंची काँक्रीटची आहे व वरील सहा मी. उंच कॅनॉपी आहे. खालच्या भागात २५ घनमी. प्रति सेकंद वेगाने हवा फिरविणारे असे ४० पंप आहेत, ते एकूण एक हजार घनमी. प्रति सेकंद हवा फिरवितात. या मनोर्‍यात वरच्या बाजूला पाच हजार फिल्टर दोन्ही बाजूंना बसविले आहेत. फिल्टर व पंखे अमेरिकेहून आयात केले आहेत. या मनोर्‍याखाली हवा खेचणारी प्रणाली आहे. हे तंत्रज्ञान मिनेसोटा विद्यापीठाने तयार केले आहे. प्रदूषित हवा २४ मी. उंचीमधून खाली खेचली जाते, दहा मी. उंचीवर ती फिल्टर केली जाते व मनोर्‍याच्या खालच्या बाजूने पंपाच्या साहाय्याने बाहेर फेकली जाते. दहा मायक्रॉन व मोठे कण फिल्टरकडून पकडले जातात व २.५ मायक्रॉन व छोटे कण ०.३ मायक्रॉनपर्यंत गाळले जातात.
 
 
 
 
 
‘आयआयटी’ मुंबई व दिल्लीकडून या टॉवरच्या कृतीची देखभाल केली जाणार आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे एक किमी त्रिज्येच्या सभोवारपर्यंत याचा उपयोग होईल, असा त्यांना अंदाज वाटतो. स्वयंचलित पर्यवेक्षित (एससीएडीए) प्रणालीच्या साहाय्याने विविध ठिकाणी नियंत्रण व नोंदणी केली जाणार आहे. ‘पीएम’ दहा व पीएम २.५ आणि तापमान व आर्द्रता नोंदली जाईल, अशी ‘मॉनिटर’ प्रणाली लवकरच बसविली जाणार आहे.चीनमध्ये ६० मी.चा टॉवर झियान शहरात बसविला आहे व तो हवा खालून खेचतो व उष्णतेने वर ढकलतो व फिल्टरने गाळलेली हवा वर बाहेर फेकली जाते. छोटे ‘स्मॉग टॉवर’ नेदरलॅण्ड व दक्षिण कोरियामध्ये बसविले आहेत.मुंबईची हवा सुधारणे जरुरीचे आहे व ‘एमपीसीबी’, मुंबई महापालिका व महाराष्ट्र सरकार हे कार्बन उत्सर्जनाचे प्रदूषण कमी करण्यासाठी जरूर प्रयत्न करतील, असे वाटते.
 
 
@@AUTHORINFO_V1@@