नवी दिल्ली : 'पहिले मै बोल नही पाता था, अब बोल सकता हू' या व्हायरल मीमची दखल आता राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने घेतली आहे. व्हायरल व्हीडिओमध्ये एक लहान मुलगा ईसाई मिशनरीच्या कार्यक्रमात होता. त्यात तो रडत आहे, त्यानंतर एक व्यक्ती म्हणते की, तुझी बहीण पूर्वी बोलत नव्हती का?, त्यावर तो नाही, असे उत्तर देतो. मग त्याला विचारलं जाते की, ती आत्ता बोलू शकते का तर तो हो म्हणतो. त्यावेळी बँकग्राऊंडला “मेरा यशु यशु।” हे गाणं वाजलं जात होतं.
राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने (NCPCR) या प्रकाराची दखल घेतली आहे.
व्हायरल व्हीडिओत पादरी बजिंदर सिंह एका अल्पवयीन मुलाचा आधार घेऊन अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासाठी प्रवृत्त केल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुलगा यात रडताना दिसत आहे. पादरी आणि मुलाचा हावभाव काही वेगळा दिसून येत आहे. तक्रार मिळाल्यानंतर NCPCR तर्फे केलेल्या तपासणीत पादरी बजिंदर सिंह यांच्या नावाने व्हीडिओ उपलब्ध आहे. बजिंदर सिंह THE CHURCH OF GLORY AND WISDOM मध्ये पादरी आहे. हे चर्च चंडीगडमध्ये आहे.
NCPCRतर्फे करण्यात आल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले जात आहे की, "प्रार्थमिकदृष्ट्या अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रकार या व्हीडिओत केला जात आहे. तसेच यासाठी एका अल्पवयीन मुलाचा वापर केला जात आहे, असेही NCPCRतर्फे म्हणण्यात आले. किशोर न्याय अधिनियम २०१५ अंतर्गत हा गुन्हा मानला जातो. तसेच व्हायरल व्हीडिओत कुणीही मास्क किंवा सोशल डिस्टंसिंगचे पालनही केलेले नाही, त्यामुळे कोरोना नियमावलींचेही उल्लंघन म्हटले जात आहे.
आयोगाने CPCR अॅक्ट, 2005 कलम 13 (1) (j) अंतर्गत या प्रकाराची दखल घेतली आहे. आयोगाने या संबंधात चंडीगडच्या डिप्टी कमिश्नरच्या प्रकरणात तपास करून सात दिवसांत कारवाई करून विशेष अहवाल प्रकाशित करण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे ‘मेरा येशु येशु’ गाण्याद्वारे धर्मांतरणासाठी तर वापरला जात नाही ना, तसेच याचा वापर करून एक चमत्कार दाखविण्याचा, बिंबविण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना याचीही चौकशी करण्यात येणार आहे.