भारतासारख्या विशाल खंडप्राय देशात व अवाढव्य लोकसंख्या असलेल्या देशामध्ये ‘सोशल डिस्टन्सिंग’ हे प्रायोगिकरित्या किती अशक्य आहे, हे आपण सर्वांनी पाहिलेच आहे. काहीही झाले, तरी आपण गर्दीला रोखू शकत नाही. बरे लसीकरण या विषाणूला पूर्णपणे रोखू शकत नाही आहे. लस निर्माण करणार्या कंपन्या भलेही सतत ‘लस घेत राहा, लस घेत राहा’ असा सल्ला देत असतील, पण सत्य परिस्थिती त्यांनाही पूर्णपणे ठाऊक आहे. अशा परिस्थितीत ‘कोविड’साठी एक ठोस उपाय करायला हवा व म्हणूनच होमियोपॅथी, आयुर्वेद व अॅलोपॅथी यांचा एक ‘इंटिग्रेटेड प्रोग्रॅम’ असायला हवा.
इतिहासात वाकून पाहिले, तर जगभरात होऊन गेलेल्या मोठ्या साथीच्या रोगांना होमियोपॅथीच्याच उपचारांनी काबूत आणण्यात यश मिळवले होते. परंतु, ही सत्य परिस्थिती झाकून ठेवली जात आहे.सरकारने जेव्हा लसीकरण सुरू केले तेव्हा स्पष्ट शब्दांत सांगितले होते की, ‘कोविड-१९’चे लसीकरण हे पूर्णपणे ऐच्छिक असेल व त्यात कुठलीही अनिवार्यता नसेल. परंतु, आपल्याकडे याच्या अगदी उलट होताना दिसत आहे. सर्व सरकारी-निम सरकारी कार्यालये, तसेच खासगी कंपन्या या त्यांच्या कर्मचार्यांवर लसीकरणासाठी दबाव आणत आहेत. लसीकरण केले नाही, तर तुम्हाला कामावर घेता येणार नाही, असा दबाव हे लोक आणत आहेत. त्याचप्रमाणे रेल्वेमध्येसुद्धा ज्यांनी लसीकरण केले आहे, अशा लोकांनाच प्रवेश आहे. ही केली जाणारी जबरदस्ती चुकीची आहे आणि लोकशाहीच्या पूर्णपणे विरोधी आहे. लसीकरणानंतर ‘कोविड-१९’आटोक्यात आलेला नाही.
जगभरात भरपूर केसेस वाढत आहेत. ही वस्तुस्थिती माहिती असूनही व लसीकरणानंतरच या विषाणूचे नवीन नवीन प्रकार येत आहेत, हे जाणूनही लसीकरणासाठी हे लोक इतका आटापीटा का करत आहेत, हे संबंधित लोक व औषधनिर्माण करणार्या फार्मा कंपन्याच जाणोत व आता तर तिसरा डोस घ्यावा, असेही विचार पुढे येऊ लागले आहेत. याचा अर्थ लोकांनी सतत भयगंडामध्ये राहायचे का? लोकांनी आयुष्यभर डोसच घेत राहायचे का? तिसर्या डोसनंतर ‘कोविड-१९’ आटोक्यात येईल, याची शाश्वती काय? तर काही नाही. नागरिकांचा ‘गिनीपिग’ होतो आहे. विचारांचे स्वातंत्र्य न देता लसीकरण दबावाने व लोकांना भयभीत करून चालू ठेवले गेले आहे. मग, भारत सरकारने सांगितले की, ‘कोविड-१९’ व्हॅक्सिनेशन इज टोटली व्हॉलन्टरी ड्राईव्ह.’ या वाक्याचा काहीच अर्थ राहत नाही. बरे, या सर्व लसींच्या संपूर्ण चाचण्या अजूनही बाहेर आलेल्या नाहीत.
सरकारने त्यांना ‘आपत्कालीन वापर’ अशा संज्ञेखाली वापरण्यास परवानगी दिली आहे, म्हणजेच काय तर लसींचे पुढील काळात होणारे दुष्परिणाम अजूनही सामान्य लोकांना ठाऊकच नाही आहेत. ही ’डीएनए’ आणि ‘आरएनए’ बेस असलेली व्हॅक्सिन्स पुढे जाऊन माणसाच्या जनुकीय प्रणालीवर कसा परिणाम करणार आहेत, हेदेखील अभ्यासण्यासारखे आहे, हे सर्व संबंधित लोकांना ठाऊक असावे म्हणूनच व्हॅक्सिननंतरही तुम्हाला ‘कोविड’ होऊ शकतो, असे सूतोवाच त्या लोकांनी आधीच करून ठेवले आहे. असो, सूज्ञमंडळींना आणखी सांगायची गरज नाही. पुढील भागात होमियोपॅथीच्या शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे या विषाणूला काबूत आणू शकतो, ते पाहू.