स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्र सरकार करणार 'आत्मनिर्भर भारत' या घोषणेचा प्रसार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Aug-2021   
Total Views |



sss_1  H x W: 0


15 ऑगस्टच्या निमित्ताने राज्य सरकारच्या सूचना

मुंबई (सोमेश कोलगे): यंदाच्या स्वातंत्र्यदिनी शासकीय कार्यक्रमातून व सोशल मीडियाद्वारे 'आत्मनिर्भर भारत' या घोषणेचा प्रसार करण्यात यावा, असे परिपत्रक राज्य सरकारने काढले आहे.

स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम कशाप्रकारे साजरा करण्यात यावा, याविषयी राज्य सरकारकडून दरवर्षी सूचना निर्गमित केल्या जातात. त्यानुसार यावर्षी आत्मनिर्भर भारत या घोषणेचा प्रसार करावा, अशी सूचना करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्या देशव्यापी टाळेबंदीनंतर ही घोषणा दिली होती. तसेच त्यानंतर 'आत्मनिर्भर भारत' अंतर्गत विशेष आर्थिक तरतूद करून अनेक योजना राबविण्यात आल्या. परंतु राज्य सरकारने यावर्षीच्या स्वातंत्र्यदीनानिमित्त दिलेली ही सूचना लक्षवेधी ठरते आहे. प्रत्येक बाबतीत केंद्र सरकारच्या विरोधाचे राजकारण करणार्‍या महाविकास आघाडी सरकारने घेतलेला या निर्णयापरती आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

तसेच ध्वजारोहाण करणारे मा. मंत्री/ राज्यमंत्री वेळेवर पोहचू शकणार नसतील तर विभागीय स्तरावर विभागीय आयुक्तांनी व जिल्हा स्तरावर जिल्हाधिकार्‍यांनी ध्वजारोहण करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

मंत्रालयावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सकाळी ९.०५ वाजता कार्यक्रम होईल तर राज्यपालांच्या हस्ते पुणे येथे कार्यक्रम होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
@@AUTHORINFO_V1@@