पॅरालम्पिकमध्ये भारताला सुवर्णसंधी ; भाविनाबेन पटेल अंतिम फेरीत

पॅरालम्पिकमध्ये भारताला सुवर्णसंधी ; भाविनाबेन पटेल अंतिम फेरीत

    28-Aug-2021
Total Views |

Paralympic_1  H
 
 
टोकियो : टोकियोमध्ये सुरु असलेल्या पॅरालम्पिक २०२०मध्ये भारताला पहिले पदक मिळण्याची शक्यता आहे. भारताची टेबल टेनिसपटू भाविन पटेलने अंतिम सामन्यात आपले स्थान निश्चित केले आहे. आता सुवर्ण पदकापासून ती एक पाऊल दूर आहे. २९ ऑगस्टला हा अंतिम सामना होईल. हा सामना चीनच्या झाउ यिंग सोबत होणार असून सर्व देशाचे लक्ष आता या सामन्याकडे लागले आहे.
  
भाविन पटेलने उपांत्य सामन्यात जागतिक तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडू असलेल्या मियोचा पराभव केला. भाविनने हा सामना ३-२ (७-११, ११-७, ११-४, ९-११, ११-८) असा जिंकला. भाविन पटेलने अंतिम सामन्यात स्थान मिळवल्याने भारताचे एक पदक निश्चित झाले आहे.
  
भाबिनाबेन टोकियो पॅरालम्पिकच्या पहिल्या सामन्यात पराभूत झाली होती. तिला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली चीनची खेळाडू हाउ यिंगने ३-०ने पराभूत केले होते. यामुळे तिला मेगानविरुद्धचा सामना कोणत्याही स्थितीत जिंकावा लागणार होता. यामध्ये तिने विजय मिळवत स्पर्धेतील आव्हान राखले. भाविनाबेन दोन सामन्यात ३ गुण मिळवत नॉकआउट फेरीसाठी पात्र ठरली.