आंबेडकरनगरवासी १५ वर्षांपासून तहानलेलेच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Aug-2021   
Total Views |
PIPELINE_1  H x
 
 
जलवाहिनीचे पोकळ आश्वासन भांडूपकरांच्या नशिबी फसवणूकच
 
 
मुंबई  : मुंबईतील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच मुंबई महापालिका प्रशासनाचे प्रथम कर्तव्य म्हणजे शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविणे हेच आहे. मात्र, भांडूपच्या रमाबाई आंबेडकरनगरमधील रहिवाशांच्या घशाला मागील 15 वर्षांपासून पडलेली कोरड दूर करण्यात अद्याप महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेला यश आलेले नाही.भांडूपच्या रमाबाई आंबेडकरनगरमधील जनतेची मागील 15 वर्षांपासून नऊ इंच व्यासाच्या जलवाहिनीच्या पोकळ आश्वासनाखाली फसवणूक केली जात आहे. स्थानिक नगरसेवक आणि राजकीय मंडळी ‘जलवाहिनी’ या एका शब्दामुळे मागील अनेक वर्षांपासून आश्वासने देत जिंकून येत आहेत. मात्र, अद्याप या भागातील नागरिकांची ही मागणी फलद्रुप होताना दिसून येत नाही.
 
 
भौगोलिक स्थिती अडचणीची असलेल्या भांडूपमधील सदर रमाबाई आंबेडकरनगर हे भौगोलिकदृष्ट्या उंचवट्यावर वसलेले आहे. एका टेकडीवरच जणू हे नगर वसलेले आहे. त्यामुळे स्वाभाविकरीत्या सध्याच्या जलवाहिनीमधून वाहणारा पाण्याचा प्रवाह जसजशी उंची वाढत जाते, त्या प्रमाणात कमी होत जातो. पाणी जास्तदाबाने यावे, यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिकांनी त्यासाठी पर्यायी व्यवस्था उभारली आहे. मात्र, ती उभारण्यासाठी केला जाणारा खर्च हादेखील महत्त्वाचा विषय आहे. प्रभागामध्ये येणारे पाणीही अवघ्या तीन तासांच्या मर्यादित वेळेत येते. नागरिकांना ज्या जलवाहिनीतून पाण्याचा पुरवठा केला जातो, त्या वाहिन्या उघड्या गटारातून वाट काढतच आंबेडकरनगरपर्यंत पोहोचतात. त्यातही अर्धा तास अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त पाणी नळांमधून येते, ज्यामुळे नागरिकांना अस्वच्छ पाण्याचा पुरवठा होतो व यातून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
 
केवळ आश्वासने;पूर्तता कधी?
माता रमाबाई आंबेडकरनगरातील पाणीपुरवठा समस्या सोडवू, असे सांगत गेली 15 वर्षे स्थानिक नगरसेवक निवडणूक लढवत आणि जिंकत आलेले आहेत. ‘आवाज कुणाचा‘ म्हणत स्थानिक नगरसेवकाने लोकांना गेली 15 वर्षे सांगितले आहे की, इथला पाण्याचा प्रश्न सोडवू. त्यासाठी दिनशॉ ब्रिजमागील मोकळ्या जागेतून पाण्याची नऊ इंच व्यासाची पाईपलाईन टाकली जाईल, असे आश्वासनही नगरसेवकाकडून देण्यात आले. मात्र, “गेली 15 वर्षे आम्हा स्थानिक रहिवाशांच्या नशिबी फसवणूकच आली आहे,” असे स्थानिकांनी म्हटले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@