‘देवबाभळी’ नाट्यसंहितेस साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Aug-2021   
Total Views |

devbhbali_1  H
 
मुंबई  : नाट्य क्षेत्रातील महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा मानल्या जाणार्‍या साहित्य अकादमीच्या युवा साहित्य पुरस्कारांची गुरुवार, दि. २६ऑगस्ट रोजी घोषणा करण्यात आली. युवा साहित्य अकादमीचा मराठीचा यंदाचा पुरस्कार लेखक-दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांच्या ‘देवभाबळी’ या नाट्यसंहितेस जाहीर करण्यात आला. ‘देवबाभळी’ या दोन अंकी नाटकास ३९ पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

मराठी साहित्याबरोबर बंगाली
 
साहित्यामध्ये श्याम बंडोपाध्याय यांच्या ‘पुराणपुरुष’ या कांदबरीसाठी पुरस्कार जाहीर झाला. युवा साहित्य अकादमीच्या त्रिसदस्यीय समितीकडून २०२० चे पुरस्काराचे काम पाहिले होते. साहित्य अकादमीतर्फे दरवर्षी ३५ वर्षांच्या आतील युवा लेखकांच्या साहित्य कृतीस ‘युवा साहित्य पुरस्कार’ देण्यात येतो. यामध्ये ५० हजार रोख रक्कम व ताम्रपत्र यांचा समावेश असतो.
 
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर व्यक्त होताना प्राजक्त देशमुख म्हणाले की, “साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याने खूप आनंद झाला आहे. हा पुरस्कार खर्‍या अर्थाने नाट्य चळवळीचा पुरस्कार आहे. दोन वर्षांपासून ठप्प असणार्‍या रंगभूमीला या पुरस्काराने आनंदाची बातमी मिळालेली असून आज नाट्यगृहे सुरू असताना ही आनंदाची बातमी मिळाली असती, तर खूप आनंद झाला असता. नाटक ही साहित्यकृती रुढार्थाने परावलंबी कला असल्याने ते प्रयोगातून घडते. मिळालेल्या पुरस्काराने नाट्यसृष्टीतील साहित्याचे मूल्य अधोरेखित होणार आहे. त्यामुळे हा माझा एकट्याचा सन्मान नसून ‘भद्रकाली प्रोडक्शन’ परिवाराचा हा सन्मान आहे.
 
आनंदाला आता निराशेचीकिनार नको; नाट्यगृहे सुरू करा

साहित्य प्रकारामध्ये इतर साहित्यकृतीच्या तुलनेने नाट्यसंहिता कमी प्रमाणात वाचल्या जातात. मात्र, साहित्य अकादमीसारख्या नामांकित संस्थेने नाट्यसंहितेचे साहित्यमूल्य ओळखून ‘देवबाभळी’ची निवड केली. त्यामुळे खर्‍या अर्थाने मी माझा गौरव समजतो. नाटकासाठी पुरस्कार जाहीर होताना राज्यशासनाने नाटकासंबंधित असणार्‍या विभागाने यास निराशेची किनार न ठेवता नाट्यगृहे लवकरात लवकर सुरू करावित.
 
-प्राजक्त देशमुख,

युवा साहित्य अकादमी पुरस्कारार्थी लेखक



@@AUTHORINFO_V1@@