डॉ. संतोष कामेरकर यांची ‘बोर्ड ऑफ मॅनेजमेंट’ (बीओएम) नियुक्ती
मुंबई : ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’च्या (आरबीआय) आदेशाने सहकारी बँकेचे कामकाज चांगल्या प्रकारे करण्यासाठी नेमण्यात येणार्या व्यवस्थापन समितीमध्ये डॉ. संतोष कामेरकर यांची ‘बोर्ड ऑफ मॅनेजमेंट’ (बीओएम) म्हणून नियुक्ती करण्यात आली
आहे.
सहकारी बँकेच्या संचालक मंडळाबरोबर सहकार्य करून बँकेचे कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी ही समिती प्रयत्नशील असणार आहे.डॉ. संतोष वसंत कामेरकर हे गेली १६ वर्षे वैश्य सहकारी बँकेचे संचालक असून, यशस्वी उद्योजक व बिझनेस कोच आहेत. १५ पुस्तकांचे ते लेखक असून अनेक संस्थांचे मार्गदर्शक आहेत.