पूलाचे कामाचे श्रेय कोण्या एकटयाचे नव्हे - मंदार हळबे

पूलाचे कामाचे श्रेय कोण्या एकटयाचे नव्हे- मंदार हळबे

    26-Aug-2021
Total Views |
 
 
 
kopar pul photo_1 &n 

डोंबिवली : कोपर पूलाचे काम पूर्ण होण्यासाठी दोन वर्षाचा कालवधी लागला आहे. या कामासाठी सगळ्य़ांनीच पाठपुरावा केला आहे. त्यामुळे पूलाच्या कामाचे श्रेय कोणत्याही एका व्यक्तीला देऊन चालणार नाही. शिवसेनेच्या लोकांनी केलेली मागणी जनहिताची आणि भाजपाने केलेली मागणी विकास कामात अडथळा असा प्रतिप्रश्न भाजपचे माजी नगरसेवक मंदार हळबे यांनी शिवसेनेला केला आहे.

कोपर उड्डाणपूलाचे आज पाहणी करण्यात आली. या पाहणी दरम्यान कोपर पूलाच्या कामात काही पक्षाचे लोक अडचणी आणत होते. त्यांनी पूलाला लागून असलेल्या बिल्डींग वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यांना देखील पूलाच्या लोकार्पण सोहळ्य़ास बोलविण्यात येईल अशा शब्दात शिवेसेनेचे नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी भाजपाचा नामोल्लेख न करता भाजपावर टीका केली. या टीकेला उत्तर देताना हळबे बोलत होते.

हळबे म्हणाले, पत्रीपूलाच्या कामाला पाच वर्षाचा कालवधी लागली. मात्र कोपर पूलाचे काम दोन वर्षात पूर्ण होत आहे. मी स्वत: रेल्वे सोबतच्या सर्व बैठकांना हजर होतो. पूलाला लागून असलेल्या बिल्डींगमधील नागरिकांची घरे वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यांचे पुर्नवसन व्हावे अशी मागणी नागरिकांच्या वतीने केली होती त्यात गैर काय आहे. पूलाच्या कामाला विरोध नव्हता. मात्र त्यांचे पुर्नवसन केले जावे एवढीच त्यांची मागणी होती. कोपर पूल हा वाहतूकीच्या दृष्टीने महत्त्वाचा पूल आहे. ठाकुर्ली पूलाचे काम सुरू असताना तो मोठा करण्यात यावा अशी मागणी म्हात्रे यांनी का केली नाही असा टोला हळबे यांनी लगावला.
 
 
कोपर पूलाचे काम अंतिम टप्प्यात
गणेश चतुर्थीच्या आधी वाहतूकीसाठी होणार खुला

डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर रेल्वे उड्डाणपूलाचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या गणेश चतुर्थीपूर्वी तो नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे. कोपर पूल हा धोकादायक झाला होता. तो पाडण्यात आला. पूलाचे काम करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागला. या सगळ्य़ा अडचणींवर मात करीत पूलाच्या कामाला गती देण्यात आली. या पूलाच्या कामासाठी सुमारे दहा कोटी रू.चा खर्च करण्यात आला आहे. कोरोना काळातील दुसरी लाटेत ऑक्सीजनचा तुटवडा जाणवला होता. या अडचणींवर मात करीत आता कोपर पूलाचे काम पूर्णत्वास येत आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी महापालिकेचे अधिकारी देखील झटत होते असे दिपेश म्हात्रे यांनी सांगितले.
 
 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------