पाण्याच्या चेंबर्समध्ये घुशी आणि कचरा स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत कुठे?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Aug-2021   
Total Views |

Pratiksha Nagar _1 &


मुंबई (योगिता साळवी) : मुंबईच्या प्रतीक्षानगरमधील नागरिक सध्या आपल्या आरोग्याशी होत असलेल्या खेळाकडे हतबलतेने पाहून आपले उर्वरित दिवस काढत आहेत. स्थानिक नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी होत असलेल्या अक्षम्य दुर्लक्षाकडे प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी आता स्थानिक रहिवासी करू लागले आहेत.


प्रतीक्षानगरच्या ट्रान्झिस्ट कॅम्पमधील तीन इमारतींसाठी बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्यांशेजारीच या पाण्याचे वितरण ट्रान्झिस्ट कॅपमधील नागरिकांना करण्यासाठी चेंबर्स बनविण्यात आलेले आहेत. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे पाण्याचे वितरण करण्यासाठी बांधण्यात आलेल्या या चेंबर्सला झाकणच नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबतीत ट्रान्झिस्ट कॅम्पमधील रहिवाशांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ‘म्हाडा’ प्राधिकरणाकडे वारंवार तक्रार करूनही सदरील चेंबर्सला झाकण लावण्यात आलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे.
चेंबर्समध्ये घुशी आणि कचरा
 
 
पाण्याच्या वितरणासाठी बनविण्यात आलेल्या या चेंबर्सना झाकण नसल्यामुळे आता यात मृत झालेल्या घुशी, तसेच कचरा आढळून अडकल्याचे समोर आले आहे. प्रशासनाच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे आणि हलगर्जीपणामुळे स्थानिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. चेंबर्सबाबतीत होत असलेल्या या दुर्लक्षामुळे परिसरातील पाच ट्रान्झिस्ट कॅम्पमधील रहिवासी आजारी पडत असल्याचे प्रकार घडू लागले आहेत.
 
 
सदर प्रकरणावर बोलताना प्रतीक्षानगरमधील नागरिकांनी आपल्या संतप्त भावना आवेशपूर्ण पद्धतीने मांडल्या आहेत. “‘म्हाडा’च्या अखत्यारीतील या इमारतींमधल्या समस्या काही केल्याचे संपायचे नाव घेत नाहीत. या कॅम्पमधील 55/56/58/59/60 या इमारतींसाठीचा पाण्याच्या टाकीचे चेंबर्स तिथे टाकीजवळच आहेत. या चेंबर्सवर झाकण नाहीत. त्यापैकी दोन चेंबर्सची अवस्था तर अत्यंत बिकट आहे. या इमारतीतील लोकांना नेहमी आरोग्याच्या समस्या भेडसावू लागल्या. दूषित पाण्याची समस्या हे एक कारण होते. दूषित पाण्याचा शोध घेताना या इमारतीमधील काही लोकांनी या चेंबर्सची समस्या पाहिली. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून इमारतीतील लोक ‘म्हाडा’कडे धाव घेत आहेत. आता तर या चेंबर्समध्ये मेलेली घूस आणि कचर्‍याचे आगार पाहून आमचा संताप अनावर होऊ लागला आहे,“ अशी भावना काही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
 
“‘म्हाडा’च्या वतीने आता या चेंबर्सची डागडुजी करण्याचे काम तत्काळ हातात घेण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. मात्र, या ट्रान्झिस्ट कॅम्प इमारतीमधील समस्यांची ही छोटीशी झलक आहे. इथे ‘म्हाडा’ने आकारलेले भाडे, अस्वच्छता, पाणीगळती वगैरे समस्या वर्षानुवर्षे आहेत. मात्र, ‘म्हाडा’ आणि स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाहीत,“ असा आरोप रहिवाशांचा आहे.चेंबर्सवर झाकण नसल्यामुळे आणि त्यांची अवस्था बिकट असल्यामुळे या चेंबर्समध्ये नेहमी काही ना काही पडत असते. ट्रान्झिस्ट कॅम्पमधील पाच इमारतींच्या पाण्याच्या टाकीच्या चेंबर्ससह इमारतीतील पाण्याची गळती थांबवण्यासाठी ‘म्हाडा’कडे कित्येक दिवस पाठपुरावा करत आहे. आता ‘म्हाडा’ तत्काळ या चेंबर्सवर झाकण बसवणार आहे. इमारतीचे दुसरेही प्रश्न ‘म्हाडा’ने असेच सोडवावेत.
 
 
- दत्ता केळुस्कर, वॉर्ड अध्यक्ष १७३, भाजप
 
 
@@AUTHORINFO_V1@@