कोरोना सुट्टीवर आहे... हिंदू सणांवर प्रतिबंध, आंदोलने, मोर्चे सुरू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Aug-2021   
Total Views |

Varun Sardesai _1 &n



राज्य सरकारने दोनच दिवसांपूर्वी दहीहंडी सणावर प्रतिबंध घालून तिसऱ्या लाटेची भीती घालत आरोग्याला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. मात्र, लगेचच त्याच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक व आंदोलनासाठी केलेल्या राजकीय आंदोलनात झालेल्या गर्दीचा हिशोब कुणीही ठेवला नाही...


दहीहंडी मंडळांचे आयोजक, पथकांचे अध्यक्ष, राज्याच्या मंत्रीमंडळातील महत्वाच्या नेत्यांसह मुंबई पोलीसांची एक व्हीडिओ कॉन्फरन्स २३ ऑगस्ट रोजी पार पडली. दहीहंडी घेण्यावर निर्बंध लादले. गोविंदा पथकांनी त्यांच्या मंडळांव्यतिरिक्त इतर कुठेही दहीहंडी फोडायला जाऊ नये, सणांपेक्षा आरोग्य महत्वाचे, लोकांच्या आरोग्याशी खेळ नको, आपण सण साजरा करताना आरोग्यविषयक उपक्रम घेऊयात, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याच बैठकीत केले होते.

गोविंदा पथकांनी मुख्यमंत्र्यांचा मान राखत या गोष्टीला पाठींबा दर्शवला. परंतू, दुसऱ्याच दिवशी राज्यभर शिवसैनिकांनी अक्षरक्षाः धुमाकूळ घातला. कुठे आंदोलने झाली, कुठे राडा झाला तर भाजपच्या कार्यालयांचीही तोडफोड झाली. नारायण राणेंच्या जुहू येथील बंगल्यावर युवा सेनेने केलेल्या आंदोलनात चेंगराचेंगरी झाली. पोलीसांना लाठीहल्ला करावा लागला इतकी गर्दी हाताबाहेर गेली. राज्यभरातही असेच पडसाद पहायला मिळाले. याला प्रत्युत्तर म्हणून भाजपनेही ठीकठिकाणी आंदोलन केले.


राणेंना झालेल्या अटक व जामीन प्रकरणात जमा झालेल्या गर्दीची जबाबदारी कुणाच्या अंगावर ढकलणार, राजकीय नेते अशाप्रकारच्या कारवाया आणि आंदोलने करून जनतेत काय संदेश देऊ इच्छीत आहेत?, हे यातून दिसते. उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या पक्षातील मंडळींना आंदोलन न करण्याचा किंवा शांतता राखण्याचे आवाहन का केले नाही?, हे प्रश्न कायम आहेत.
हा झाला आंदोलनाचा भाग, याच बैठकीत मुंबई पोलीस आयुक्तांनी या सणाला सवलत दिल्यास गणेशोत्सव, नवरात्र या सणांनाही मुभा द्यावी लागेल, अशी भीती व्यक्त केली होती.


तर मग याच नियमानुसार, राज्यात झालेल्या शिवसेनेच्या आंदोलनाला थांबविण्याचा प्रयत्न पोलीसांनी का केला नाही? हा प्रश्न आहे. गणेशोत्सवात जाण्यासाठीही कोरोना नियमावलींचे पालन करण्याचे आदेश राज्याने दिले आहेत, जर सणांना निर्बंध असतील तर मग आंदोलने, मोर्चे यांना निर्बंध का घातले जात नाहीत. तिथे कोरोना निष्क्रीय होतो का हा देखील प्रश्न आहे.




@@AUTHORINFO_V1@@