अफगाणिस्तानात तालिबान महिलांना स्वातंत्र्य देणार?

तालिबानच्या भूमिकेबद्दल अफगाणिस्तानातील महिलांमध्ये संभ्रमाचं वातावरण

    25-Aug-2021
Total Views |
 muslim_1  H x W
 
 
तालिबानच्या भूमिकेबद्दल अफगाणिस्तानातील मुस्लिम महिलांमध्ये संभ्रमाचं वातावरण
 
अफगाणिस्तान : अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातील महिलांना स्वातंत्र्य मिळेल का? असा प्रश्न अफगाणिस्तानातील मुस्लिम महिलांमध्ये निर्माण झाला आहे. तालिबानच्या राजवडीत यापूर्वी १९९६-२००१ च्या काळावधीत महिलांना नोकरी करण्यास मनाई होती. कोणत्याही मुलींना शाळेत किंवा कॅालेज मध्ये प्रवेश घेता येणार नाही, महिला बुरखा परिधान करुन घराच्या बाहेर पडू शकतात. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या पुरुषांसोबत बोलण्यास महिलांना परवानगी देखील  नव्हती,
 
तालिबानने अफगाणिस्तानात कब्जा केल्यानंतर, शरिया कायद्याअंतर्गत महिलांना स्वातंत्र्य देण्यात येईल, अस तालिबानने जाहीररित्या भूमिका मांडली आहे. अफगाणिस्तानातील महिलांमध्ये तालिबानने मांडलेल्या भूमिकेबद्दल महिलांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. परंतू महिलांना शरिया कायद्य़ाचे पालन करावे लागणार. असल्याने महिलांवर होणारे अत्याचार थांबतील का असा प्रश्न तेथील महिलांनी केलेला आहे.एका महिला पत्रकारालाही कार्यालयात जाण्यापासून रोखण्यात आले आहे. अनेक महिलांनी तालिबानच्या भीतीने बंदीस्त करुन घेतले आहे.
 
 
शरिया कायदा काय आहे?
शरियाला इस्लामिक कायदा असेही म्हणतात. शरिया ही कुरान, हदीस आणि पैगंबर मुहम्मद यांच्या सुन्नावर आधारित नैतिक आणि कायदेशीर चौकट आहे. जर सोप्या भाषेत समजले तर शरियाला इस्लामिक कायदे आणि चालीरीतींनुसार जीवनशैली म्हणता येईल.ते एका उदाहरणासह समजून घ्या- भारतात चोरीची शिक्षा संविधान किंवा आयपीसीच्या तरतुदींच्या आधारे ठरवली जाते. जिथे शरिया कायदा लागू आहे, तिथे चोरीची शिक्षा कुराण आणि पैगंबरांनी सांगितलेल्या पद्धतींद्वारे निश्चित केली जाईल.