
राणेंना अटकेच्या सुचना त्यात गैर काय - विनायक राऊत
रत्नागिरी : रत्नागिरीचे पालकमंत्री आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी नारायण राणे यांना तत्काळ अटक करावी असा दबाव पोलिसांवरती टाकला,असे आरोप त्यांच्यावरती करण्यात आले आहेत. रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत परब बोलत असताना, त्यांना फोन आल्यामुळे दोन वेळा पत्रकार परिषद थांबवावी लागली.
पहिल्या वेळी त्यांनी पोलिसांना फोन केला, तुम्ही त्यांना अटक केली का नाही? असा प्रश्न केला, कोणती ऑडर ते लोक मागत आहेत. त्यांना त्वरित अटक करा. अशा प्रकारची सुचना त्यांनी पोलिसांना केली, माईक चालू असल्याने संपूर्ण संभाषण हे पत्रकरांच्या आणि तेथे उपस्थितीत असणारे लोकांच्या लक्षात येत होते. त्यामुळे अनेक पत्रकारांनी याबाबत परब यांना प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबत बोलण्यास टाळाटाळ केली.
याबाबत मात्र शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी स्पष्टीकरणं देऊन परब यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. रत्नागिरीचे पालकमंत्री म्हणून नारायण राणे यांना अटक करण्याच्या सुचना पोलिसांना दिले असतील, तर त्यात वावगं काय असे राऊत यांनी वक्तव्य केले.यापूर्वी अनिल परब यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले होते. त्यावेळी नारायण राणे यांनी ईडी ने परब यांच्यावरती कारवाई करावी असे वक्तव्य केले होते. त्यामुळे हे सुडाचं राजकारण होतंय का असा देखील प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे.