भारतीय हॉकी संघाचा सन्मान ; १० सरकारी शाळांना हॉकीपटूंची नावे

पंजाब सरकारने हा निर्णय घेत हॉकीपटूंना दिली अनोखी भेट

    23-Aug-2021
Total Views |

Hockey_1  H x W
 
चंडीगड : भारतीय हॉकी पुरुष संघाने तब्बल ४१ वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले. त्यांनी जर्मनी ५-४ असा पराभव करत कांस्य पदक पटकावले. त्यांनी केलेल्या या कामगिरीचे देशभरातून कौतुक झाले. यानंतर आता पंजाब सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पंजाब राज्य सरकारने राज्य सरकारने १० सरकारी शाळांना ऑलिम्पिक पदक विजेत्या हॉकी संघातील खेळाडूंची नावे दिली आहेत.
 
 
यावेळी पंजाबचे शालेय शिक्षण मंत्री विजय इंदर सिंग यांनी सांगितले की, "मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी शाळांचे नाव बदलण्यास मान्यता दिली आहे. जालंधरमधील मीठापूर येथील शासकीय वरिष्ठ माध्यमिक शाळेचे (जीएसएसएस) नाव हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग याच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. यापुढे शाळेचे नाव ऑलिम्पियन मनप्रीत सिंग शासकीय वरिष्ठ माध्यमिक विद्यालय, मिठापूर असे करण्यात आले आहे.
 
 
पुढे त्यांनी सांगितले की, "अमृतसरमधील टिमोवालच्या शासकीय वरिष्ठ माध्यमिक शाळेचे नाव उपकर्णधार हरमनप्रीत सिंग याच्या नावावरून करण्यात आले आहे. ऑलिम्पियन हरमनप्रीत सिंग जीएसएसएस, टिमोवाल या नावाने शाळा ओळखली जाईल. अधिकृत निवेदनानुसार, अमृतसरच्या अटारी येथील जीएसएसएस आता ऑलिम्पियन शमशेर सिंग शासकीय वरिष्ठ माध्यमिक शाळा म्हणून ओळखली जाईल."
 
 
तसेच, "फरीदकोटमधील मुलींच्या शासकीय माध्यमिक शाळा आता ऑलिम्पियन रुपिंदर पाल सिंह शासकीय माध्यमिक शाळा म्हणून ओळखली जाईल. जालंधरमधील खुसरोपूर येथील शासकीय माध्यमिक शाळेचे नाव ऑलिम्पियन हार्दिक सिंहच्या नावावरून ठेवण्यात आले. अमृतसरमधील खलाईहारा येथील शासकीय प्राथमिक शाळेचे नाव ऑलिम्पियन गुरजंत सिंह याच्या नावावरून करण्यात आले. गुरदासमधील चहल कलान शासकीय हायस्कूलचे नाव ऑलिम्पियन सिमरनजीत सिंग याच्या नावावरून ठेवण्यात आले." अशी माहिती शालेय मंत्री विजय इंदर सिंग दिली आहे.