सैन्य मागे घेतले नाहीतर गंभीर परिणाम होतील.
काबुल : अफगाणिस्तानात कब्जा मिळवल्यानंतर आता तालिबानने अमेरिकेला धमकी दिली आहे. बाइडन सरकारने ३१ ऑगस्ट पर्यंत अफगाणिस्तानातून आपले सैन्य मागे घेतले नाही तर त्याचे गंभीर परिणाम होतील. बाइ़डन त्याच्या मुद्द्यापासून मागे हटण्याचा काही अर्थ नाही. तालिबानने स्पष्टपणे सांगितले की ३१ ऑगस्टपासून हा कालावधी एका दिवसापेक्षा जास्त वाढू शकत नाही. जर अमेरिका आणि ब्रिटनने ३१ ऑगस्टच्या पुढे एक दिवस मुदतवाढ मागितली तर उत्तर नाही असे असेल. यासह, गंभीर परिणाम देखील होतील.
तालिबानने दिलेल्या धमकीला बाइडन सरकारने काहीत प्रत्युतर दिले नाही. त्यामुळे अमेरिका देश तालिबान समोर भयभीत झाला आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.अमेरिकेचे अध्यक्ष जो बाइडन यांनी यापूर्वी अमेरिकन सैन्य मागे घेण्याची ११ सप्टेंबर २०२१ ची अंतिम मुदत निश्चित केली होती. त्यानंतर ते बदलून ३१ ऑगस्ट करण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बाइडन म्हणाले की, आता अमेरिकेचे प्रदीर्घ युद्ध संपवण्याची वेळ आली आहे. बहुतेक अमेरिकन सैनिकही अफगाणिस्तानातून परतले आहेत. काही दिवसांत तालिबान अमेरिकेला कश्या प्रकारे प्रत्युत्तर दिईल हे पाहणं माहत्वाचं ठरणार आहे.