ट्विटरनंतर फेसबुकनेही काढली राहुल गांधीची 'ती' पोस्ट

ट्विटरनंतर फेसबुकनेही काढली राहुल गांधीची "ती" पोस्ट

    21-Aug-2021
Total Views |
 rahul_1  H x W:
 
 
ट्विटरनंतर फेसबुकनेही काढली राहुल गांधीची 'ती' पोस्ट
 
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावरती अल्पवनीय बलात्कार पीडितेच्या कुटुंबातील सदस्यांची ओळख उघड केल्याने ट्विटरनंतर आता त्यांच्यावर इन्स्टाग्राम आणि फेसबुकने पोस्ट हटवली आहे.
 
राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने यासंदर्भात फेसबुक आणि इन्स्टाग्रामला पत्रही लिहून राहूल गांधी यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.अल्पवयीन पीडितेच्या कुटुंबाची ओळख उघड केली जात असल्याने पॅाक्सो कायद्याच्या विरोधात आहे.
त्यामुळे राहूल गांधी यांची पोस्ट फेसबुक आणि इन्स्टाग्रामने हटवली आहे. यासंपूर्ण प्रकरणामुळे पीडितमुलीच्या पालकांना मोठ्या प्रमाणावर सामाजाच्या त्रासाला सामोरी जावे लागत आहे.
  
राहुल गांधी यांच्या राजकीय पोस्टवरही काही दिवसांसाठी निर्बंध घालण्यात आल्याने राहुल गांधी हे सोशल मीडियाच्या कारवाईच्या चक्रात सापडल्याने नेमकी त्यांच्यावर कश्याप्रकारे कारवाई करण्यात येईल ते पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे,.