मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा, देवेंद्र फडणवीस यांचे पत्र
मुंबई : नगर जिल्हातील तहसिलदार श्रीमती ज्योती देवरे यांनी स्थानिक लोकप्रतिनीधी आणि वरिष्ठ अधिकार्यांवर गंभीर आरोप केलेले आहेत. कोरोनाच्या काळात राज्य सरकारच्या नियमांप्रमाणे काम करुन स्थानिक लोकप्रतिनीधी तहसिलदार यांच्यावर दबाव आणून अपशब्दचाही वापर केला असा त्यांचा आरोप आहे.
त्यांनी एका ऑडिओ क्लिपद्वारेआरोप केलेले आहेत, लसीकरणावरून काही कर्मचार्यांना पोलिस अधिकार्यांच्या समोर मारहाण करणे, अश्लील शिविगाळ करणे, महिला कर्मचार्यांना मारण्यासाठी महिला पोलिसांना बोलाविण्यास सांगणे, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांपर्यंत प्रकरण नेल्यानंतर तहसिलदार ज्योतीताई देवरे यांच्याच बदनामीचा प्रयत्न करणे, वरिष्ठ अधिकार्यांकडूनही त्यांना धमक्या प्राप्त होणे, कोरोना काळात नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करीत असताना त्यातही अडचणी उत्पन्न करणे आणि मग थेट मंत्र्यांकडे त्यांच्या बदलीची शिफारस करणे, यातून महिला अधिकार्यांचे खच्चीकरण करणे, असे अनेक गंभीर आरोप त्यांनी केले आहेत.
यासंदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तातडीने चौकशी करुन संबंधीत स्थानिक लोकप्रतिनीधी आणि वरिष्ठ अधिकार्यांवर कारवाई करावी, असे पत्रात नमूद कलेले आहे, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कारवाईचे आदेश कधी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.