‘शिवाय’ची शक्ती...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Aug-2021   
Total Views |
sachin_1  H x W



हिंदू धर्मात अंत्यसंस्कार हा अत्यंत महत्त्वाचा विधी. पण, अनेकांच्या नशिबात हा विधी करण्यासाठी सुद्धा कोणी जवळची व्यक्ती नसते. ‘कोविड’ काळात तर रक्ताच्या नात्यांतील व्यक्तींनाही आपल्या मृत कुटुंबीयांचा अंत्यविधी करता येत नव्हता. पण, अशा मृतदेहांना अग्नी देण्याचे काम गोरेगाव येथील सचिन नथुराम भिलारे यांच्या ‘शिवाय’ संस्थेने केले. त्यानिमित्ताने त्यांच्या या महत्कार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...
 
 
 
 
सचिन भिलारे हे भारतीय जनता युवा मोर्चाचे उत्तर पश्चिम मुंबई जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. २०१० पासून ते भाजपशी जोडलेले असून सामाजिक कार्याची त्यांना सुरुवातीपासूनच आवड. याशिवाय त्यांच्या वडिलांनीही समाजकार्य सुरु ठेवण्याचा सल्ला दिल्याने सचिन यांनी ’शिवाय’ या संस्थेची स्थापना केली. तसे त्यापूर्वीपासूनच त्यांचे समाजकार्य सुरू होते. पण, २०१७ मध्ये त्यांनी संस्थेची अधिकृतरीत्या नोंदणी केली आणि सध्या कन्स्टलटन्सीच्या व्यवसायात ते आघाडीवर आहेत.
 
 
 
 
सचिन हे ‘शिवाय’ या संस्थेच्या माध्यमातून गरजूंना वैद्यकीय, शैक्षणिक मदत देण्याचे काम करतात. कोरोनाचा प्रादुर्भाव जेव्हा २०२० मध्ये सुरू झाला, तेव्हा ‘लॉकडाऊन’च्या अगदी पहिल्या दिवसापासून ‘शिवाय’ संस्थेने गरजूंना मदतीचा हात दिला. संस्थेचे हे काम अजूनही सुरूच आहे. ‘लॉकडाऊन’च्या काळात अनेकांवर उपासमारीची वेळ ओढवली. तेव्हा, अशा सगळ्या गरजूंसाठी संस्थेतर्फे सचिन यांनी अन्नवाटपाचे मोठे काम केले. तसेच कोरोना काळात रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत होता व रक्तदानाचे प्रमाणही कमी झाले होते. तसेच कोरोना रुग्णांना ‘प्लाझ्मा’चीदेखील गरज भासत होती. त्यामुळे रक्तदान शिबीर मोठ्या प्रमाणात आयोजित करण्याची आवश्यकता होती. कोरोना नियमावलीचे पालन करून रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. सातारा जिल्ह्यातील एका गावात मास्क, सॅनिटायझर, ‘आर्सेनिक अल्बम’च्या गोळ्यांचेही त्यांनी वाटप केले.




news_3  H x W:  
 
 
 
त्याचबरोबर रेल्वे किंवा रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आणि ज्यांना कोणी वाली नाही, अशा बेवारस मृतदेहांना अग्नी देण्याचे कामही सचिन यांनी केले. कोरोना काळात ज्यांच्या पाठिशी कोणी नातेवाईक नाही, अशा मृतदेहांचे अंत्यसंस्कार सचिन यांच्या ‘शिवाय’ संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले. परंतु, अशा किती मृतदेहांना अग्नी दिला, यांची आकडेवारी मात्र त्यांनी कधीही ठेवली नाही.याव्यतिरिक्त महिला सक्षमीकरणासाठी त्यांना संगणक प्रशिक्षणही संस्थेतर्फे दिले जाते. महिला दिनानिमित्ताने महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी केक तयार करण्याचे मोफत प्रशिक्षणही दिलेे जाते. या संस्थेचा मूळ उद्देश लोकापर्यंत पोहोचणे व त्यांच्या मूलभूत गरजा भागविणे असल्याचेही सचिन सांगतात.


 
news_2  H x W:




राज्य सरकारने ‘लॉकडाऊन’च्या काळात रिक्षाचालकांना दीड हजार रुपये खात्यात जमा करणार, असे सांगितले होते. त्यासाठी रिक्षाचालकांना ‘ऑनलाईन’ अर्ज भरून देण्यास सचिन यांच्या संस्थेने मदत केली. ‘आयुष्यमान भारत’सारख्या केंद्र सरकारच्या कित्येक योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कामही त्यांच्या संस्थेमार्फत सुरु असते. घरेलु कामगारांना मोफत भत्ता मिळावा, यासाठी त्यांचेही अर्ज संस्थेतर्फे भरून दिले.
 

news_1  H x W:  
 

‘कोविड’ लसीकरणासाठी अनेकांना नोंदणी प्रक्रियेत अडचण निर्माण होत असे. त्यामुळे नागरिकांना लसीकरण नोंदणीसाठी मदत करणे आणि लस विनासायास मिळवून देण्यासाठी संस्थेतर्फे प्रयत्न केले गेले. केवळ गोरेगावच नव्हे, तर इतर उपनगरांतील नागरिकांनाही लसीकरणासाठीही सचिन यांनी मदत केली. झोपडपट्टी विभागात राहणारे, दिव्यांग आणि रेशन कार्डधारक दारिद्य्र रेषेखाली असणार्‍या सर्वांसाठी योग्य मदत मिळविण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांना आरोग्य सुविधांसाठी मदत मिळवून दिली जाते. म्हणूनच गोरेगाववासीयांना सचिन यांचा मोठा आधार वाटतो.
 
 
 
 
सचिन यांचे एक रेस्टॉरंट सुरळीतपणे चालू होते. पण, लोकांसाठी काहीतरी करायचे ही इच्छा कायम त्यांच्या मनात होती. सचिन यांचे वडील नथुराम राजाराम भिलारे यांनी त्यांना “कोणाचे चांगले करता आले नाही, तर किमान वाईटही करू नका,” असे संस्कार केले होते. ते पुढे त्यांच्या आयुष्यभर कामी आले. तरूणांना एक चांगली दिशा मिळावी, या हेतूने राजकरणात पाऊल टाकण्याचा निर्णय सचिन यांनी घेतला. सचिन २०१० मध्ये भाजपशी जोडले गेले, तेव्हापासून त्यांचे कामाचे स्वरूप बघून त्यांना पक्षाने वेळोवेळी पदोन्नती दिली. लोकांच्या मदतीसाठी आपण तत्पर राहावे, या शुद्ध हेतूनेच सचिन राजकारणाकडे पूर्ण वेळ वळले. त्यांच्या या सामाजिक कार्याला पक्षाचीही साथ मिळाली. सचिन म्हणतात की, “खरंतर सामाजिक काम करताना सुदैवाने आम्हाला कोणत्याच अडचणींचा सामना करावा लागला नाही. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा चांगला पाठिंबा आम्हाला आहे. तसेच भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांचाही भक्कम पाठिंबा आहे. त्यामुळे काम करताना कोणत्याही अडचणी येत नाही.”
 
 
 
समाजकार्यातील असेच काही अनुभव सचिन भिलारे सांगतात. एके दिवशी सचिन यांनी स्वतः लिलावती रुग्णालयात जाऊन रक्तदान केले, तेव्हा त्यांना रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी एका दिवसात १२ ते १५ बाटल्या रक्त संकलित केले. एका जाहिरात कंपनीचा मालक होते. त्यांना उपचारासाठी इंजेक्शन उपलब्ध होत नव्हते. त्यांच्या पत्नीचाही कोविडमुळे मृत्यू झाला होता. पण, सचिन यांच्या मदतीने एका रुग्णालयात ते इंजेक्शन उपलब्ध झाले आणि त्यांच्या आईचा जीव वाचला. हा एक कायम स्मरणात राहील असाच प्रसंग असल्याचे सचिन भावनिक होऊन सांगतात. ' शिवाय ' ट्रस्टला सामाजिक कार्यात अनेक दात्यांचीं व मित्र परिवाराची सचिन यांना मोठी मदत झाली. ‘शिवाय’च्या विश्वस्त रुपाली कुलकर्णी यांचीही मदत झाल्याचे ते सांगतात.
 
 
 
‘शिवाय चॅरिटेबल ट्रस्ट’नी ज्यांना ज्यांना या संकटसमयी मदतीचा हात दिला, ते सर्व गरजू त्यांना मेसेज करून, तर कधी प्रत्यक्ष भेटून आभार मानायला विसरत नाहीत आणि हेच लोक “कोणालाही मदत हवी असेल, तर त्यांनी केवळ ‘शिवाय’ संस्थेकडे जावे. तुम्हाला नक्की मदत मिळेल,” असे इतरांनाही सूचवितात. कारण, आज हा विश्वास संस्थेने आपल्या कार्यातून गरजूंच्या मनात निर्माण केला आहे. तेव्हा, संस्थेच्या यापुढील कार्यासाठी दै. मुंबई तरुण भारत परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा.



@@AUTHORINFO_V1@@