वाहतुकीच्या नियमांमध्ये लवकरच होणार बद्दल

    20-Aug-2021
Total Views |
trafi_1  H x W:
 
 
वाहतुकीच्या नवीन नियामावलीचे परिवहन मंत्रलयाकडून सुचना
 
 
नवी दिल्ली: वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन होऊ नये. यासाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाने नवीन अधिसूचना जारी केली आहे,त्यानुसार राज्य सरकारला वाहतूक नियमांच्या उल्लंघनाशी संबंधित गुन्ह्याच्या 15 दिवसांच्या आत गुन्हेगाराला नोटीस पाठवावी लागेल. तसेच, चलन निकाली होईपर्यंत इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड ठेवावे लागतील.वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर, नवीन इलेक्ट्रानिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पोलीस फक्त फोटो काढून तुम्हाला चलन पाठवू शकणार नाहीत. तर त्यांना चलन बनवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डची आवश्यकता असेल.
नियम - १, एमओआरटीएच
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (एमओआरटीएच) इलेक्ट्रॉनिक देखरेख आणि रस्ता सुरक्षेच्या अंमलबजावणीसाठी सुधारित मोटार वाहन कायदा 1989 अंतर्गत अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, चलन देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करावा. "घटनेच्या 15 दिवसांच्या आत गुन्ह्याची माहिती पाठवली जाईल आणि इलेक्ट्रॉनिक मॉनिटरिंगद्वारे गोळा केलेले इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड चलन निकाली होईपर्यंत संग्रहित केले जावे," असे मंत्रालयाने ट्विट केले आहे.

नियम - २, रेड लाईट-महामार्गावर ही व्यवस्था
नवीन नियमांअंतर्गत, वाहतूक नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा प्रमुख वापर केला जाईल. यामध्ये मोशन कॅप्चर पिक्चर कॅमेरे (कार स्पीड डिटेक्शन कॅमेरे), सीसीटीव्ही कॅमेरे, स्पीड गन, बॉडी कॅमेरे, मोटर डॅशबोर्ड कॅमेरे, स्वयंचलित नंबर प्लेट ओळख यंत्रे (एएनपीआर), वजन यंत्रे आणि इतर इलेक्ट्रिक वाहने यांचा समावेश आहे.
अधिसूचनेनुसार, राज्य सरकारांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की वाहतुकीच्या नियमांचे पालन करणारे सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांच्या धोकादायक आणि अत्यंत वर्दळीच्या रस्त्यांवर स्थापित केल्या आहेत. या व्यतिरिक्त, किमान दहा लाख लोकसंख्या असलेल्या सर्व प्रमुख शहरांच्या महत्त्वाच्या चौकाचौकात आणि चौकात ही उपकरणे बसवली जातील.

नियम - ३, या राज्यांमध्ये डिजिटल उपकरणे बसवली जातील
उत्तर प्रदेशातील कानपूर, लखनौ, गाझियाबाद, वाराणसीसह 17 शहरे, मध्य प्रदेशातील भोपाळ, इंदूर, उज्जैनसह 7 शहरे, जयपूर, उदयपूर, राजस्थानमधील कोटासह 5 शहरे, महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूरसह 19 शहरे, झारखंडमधील रांची, जमशेदपूरसह 3 शहरे, गुजरातमधील सुरत, अहमदाबादसह 4 शहरे, बिहारमधील पाटणा, गया, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, जम्मू -काश्मीर, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, डिजिटलसह 3 शहरे पंजाब, तामिळनाडू, ओडिशा, मेघालय, नागालँड, तेलंगणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालसह 132 शहरांमध्ये उपकरणे बसवली जातील.
कोणात्या नियमांचे उल्लघंन केल्यानंतर होणार कारवाई?
1. अतिवेग
2. चुकीच्या ठिकाणी कार पार्क करणे
3. ड्रायव्हर किंवा मागच्या सीटवरील प्रवाशांकडून नियमांचे उल्लंघन
4. दुचाकीवर हेल्मेट न घालणे
5. रेडलाइट जंप करणे
6. वाहन चालवताना मोबाईलचा वापर
7. ओव्हरलोडिंग
8. सीट बेल्ट न घालणे
9. माल वाहनात प्रवासी घेऊन जाणे
10. नंबर प्लेट सदोष किंवा लपलेली
11. वाहनांमध्ये जास्त उंचीवर माल लोड करणे