पुणे वाहतुक पोलिसांचा अजब कारभार ; दुचाकीस्वाराच्या जिवाशी खेळ
पुणे : पुणे वाहतुक पोलिसांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे , या व्हि़डिओच्या माध्यामतून वाहतुक पोलिसांचा कारभार किती अजब असेल, सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे, पुण्यातील नाना पेठ परिसरातील दुचाकी स्वारसह वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी टोईंगने उचलून नेली, ज्या दरम्यान दुचाकीस्वाराला वाहतूक विभागाकडून उचलले जात होते, तो म्हणत होता, 'सर, माझी बाईक नो-पार्किंगमध्ये नाही, मी दोन मिनिटे रस्त्याच्या कडेला उभा होतो. मी माझी बाईक पार्क केलेली नाही, मी लगेच निघतो आहे, कृपया माझ्यावर कारवाई करू नका. एवढे सांगूनही वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ऐकले नाही आणि दुचाकीसह त्या व्यक्तीला उचलले नेले, असा आरोप आहे.
सोशल मीडियावर घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोक वाहतूक विभागाच्या कार्यपद्धतीवर नाराज झाले आहेत, सदरचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. दरम्यान, वाहतूक विभागाने सांगितले की दुचाकी 'नो-पार्किंग' झोनमध्ये उभी केली होती आणि स्वार जाणीवपूर्वक टोइंग करताना त्यावर बसला होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाहतूक पोलिसांवर सामान्यांनी टिक्का करायला सुरवात केली. सदरच्या घटनेबाबत वाहतूकीचे नियम पाळूनही सामान्य लोकांना वाहतूक शाखेकडून जर अश्याप्रकारे वागणूक मिळत असेल तर वाहनांचे नियम सामान्य लोकांनी कसे पाळावेत याचं उत्तरही वाहतूक पोलिसांनी द्यावे असा प्रश्न सोशल मीडियावरती नेटकरी करत आहेत