टोकियो : भारतीय महिला थाळीफेकपटू कमलप्रीत कौरने अंतिम फेरीत प्रवेश करत पदकांच्या आशा जागवल्या होत्या. मात्र, तिला या स्पर्धेत सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. असे असले तरीही, तिने ऑलिम्पिकमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. विशेष म्हणजे, तिची ही पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा होती. अमेरिकेच्या वॅलेरी ऑलमनला सुवर्ण, जर्मनीच्या के. पुडेन्झला रजत, तर क्युबाचा यमी पेरेजने कांस्य पदक पटकावले आहे.
अंतिम १२मध्ये निवड झालेल्या कमलप्रीतने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली. तिने ६३.७० मीटर लांब थाळी फेकली. तर सुवर्ण पदक विजेत्या वॅलेरी ऑलमॅनने ६८.९८ लांब थाळी फेकली. रजत पदक विजेत्या क्रिस्टन पुडेन्झने ६६.८६ मीटर लांब, तर कांस्य पदक विजेत्या क्यूबाच्या येमी परेजने ६५.७२ मीटर लांब थाळी फेकली. विशेष म्हणजे तिने ६० मीटरच्या वरची कामगिरी करण्यात सातत्य ठेवले. यामुळे तिने सहावे स्थान गाठले.