कोरोनामुक्ती’चा दर 97.48 टक्क्यांवर

    17-Aug-2021
Total Views |
 cr_1  H x W: 0
 
 
कोरोनामुक्ती’चा दर 97.48 टक्क्यांवर
 
नवी दिल्ली : भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर 97.48 टक्क्यांवर पोहोचला आहे. भारतात महामारीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत एकूण 3 कोटी, 14 लाख, 11 हजार, 924, तर गेल्या 24 तासांत 35 हजार, 909 रुग्ण ‘कोविड-19’ संसर्गातून बरे झाले आहेत. भारतात गेल्या 24 तासांत 32 हजार, 937 नव्या रुग्णांची नोंद झाली. सलग 50 दिवस 50 हजारांपेक्षा कमी दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सातत्यपूर्ण आणि समन्वित प्रयत्नांचे हे फळ आहे. देशात आज सक्रिय रुग्णसंख्या 3 लाख, 81 हजार, 947 इतकी असून ती एकूण रुग्णसंख्येच्या 1.18 टक्के आहे. चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ होत आहे.
 
गेल्या 24 तासांत देशात 11 लाख, 81 हजार, 212 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकूण 49.48 कोटींपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशात एकीकडे चाचण्या वाढत असून दुसरीकडे साप्ताहिक ‘पॉझिटिव्हिटी’ दरात घट कायम आहे. सध्या साप्ताहिक ‘पॉझिटिव्हिटी’ 2.01 टक्के, तर दैनंदिन ‘पॉझिटिव्हिटी’ 2.79 टक्के आहे. गेल्या 21 दिवसांपासून हा तीन टक्क्यांपेक्षा कमी तर सलग 70 व्या दिवशी पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत सर्व स्रोताद्वारे 56.81 कोटींहून अधिक लसींच्या मात्रा राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना पुरवल्या आहेत. आणखी वाया गेलेल्या मात्रांसह आतापर्यंत एकूण 54 कोटी, 22 लाख, 75 हजार, 723 मात्रा देण्यात आल्या आहेत. याशिवाय लसीच्या 2.89 कोटींहून अधिक शिल्लक आणि न वापरलेल्या मात्रा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे उपलब्ध आहेत.