नवी दिल्ली : ५१.७० मीटर उंच रॉकेटने सकाळी ०५.४३ वाजता नियोजित वेळेप्रमाणे उड्डाण केले आणि पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात त्याची कामगिरी सामान्य होती, असे इस्रोने सांगितले. परंतु प्रक्षेपणानंतर काही मिनिटांनी, अंतराळ एजन्सीने सांगितले की तेथे क्रायोजेनिक अवस्थेत इंजिन प्रज्वलित होण्यात अयशस्वी झाले.
भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) गुरुवारी एक निरीक्षण उपग्रह कक्षेत पाठवण्यास अपयशी ठरले यामुळे त्यांना मोठा धोका बसला आहे.जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल (GSLV) फ १० रॉकेट GISAT-1 पृथ्वी निरीक्षण उपग्रह (EOS-03) ने ओडिशाच्या स्पेसपोर्टवरून यशस्वीपणे उड्डाण केले होते.
परंतु क्रायोजेनिक अवस्थेत विसंगती दिसून आली,त्यामुळे हे मिशन अपयशी झाले. असे इस्रोचे अध्यक्ष 'के सिवन' म्हणाले.२०१७ वर्षी इस्रोचे असे एक मिशन अपयशी झाले होते,परंतु त्यांनतर आज ४ वर्षाने,इस्रोचे मिशन अपयशी झाले आहे,परंतु सॅटेलाईट लाँच मध्ये असे अपयश येणे हे सामान्य असते,त्यामुळे इस्रो नक्की पुन्हा उठून उभी राहील.