हाॅकी कर्णधार मनप्रीतच्या 'या' मोदी समर्थक भूमिकेचा काॅंग्रेसने केला विरोध

    11-Aug-2021
Total Views |
congress_1  H x



दिल्ली -
टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग याने मंगळवारी राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्काराच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले. मनप्रतीच्या या समर्थनाचा काॅंग्रेस प्रवक्ते आणि समर्थकांकडून विरोध करण्यात आला.
 
 
पुरुषांच्या हॉकी संघाचे कर्णधार मनप्रीत सिंग यांच्या केंद्र सरकारच्या या निर्णयाचे समर्थन करणे काँग्रेसला आवडलेले नाही. खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्यासाठी मनप्रीतने दिलेल्या पाठिंब्याला काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यासह काॅंग्रेस समर्थकांनी सोशल मीडियावर विरोध केला आहे. काॅंग्रेस प्रवक्त्या डॉ.शामा मोहम्मद यांनी ट्विटरवर म्हटले, "आमचे पुरुष हॉकी कर्णधार या वस्तुस्थितीपासून अनभिज्ञ आहेत की हा राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार होता, केवळ खेलरत्न पुरस्कारच नव्हता!"
 
 
काँग्रेसचे समर्थक सुमंत रमण यांनीही मनप्रीत सिंग यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६ ऑगस्ट २०२१ रोजी घोषणा केली होती की आतापासून राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार म्हणून ओळखला जाईल. पंतप्रधानांनी म्हटले होते की, त्यांना भारतीय हॉकीच्या दिग्गजांच्या नावावर पुरस्कार देण्यासाठी देशभरातील लोकांकडून विनंत्या आल्या आहेत. त्यामुळे त्याच्या इच्छेचा आदर करत नाव बदलण्यात आले आहे.
 
खेलरत्न पुरस्कार हा भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान आहे. आतापर्यंत हे नाव माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र राजीव गांधी (माजी पंतप्रधान) यांच्या नावावर होते. पुरस्काराची नावे राजकारण्याऐवजी क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांच्या नावावर ठेवण्याची नागरिकांची प्रदीर्घ मागणी होती.