यूपीएससीचे टॉपर टीना डाबी आणि अतहर आमीर खान यांचा घटस्फोट

    11-Aug-2021
Total Views |

TD UPSC_1  H x


नवी दिल्ली :
टीना डाबी आणि अतहर आमीर खान, जे २०१५ मध्ये अनुक्रमे यूपीएससीच्या परीक्षेत प्रथम आणि द्वितीय आले होते.नंतर २०१८ मध्ये त्यांनी एकमेकांसोबत लग्न केले होते,त्यांची ही कथा अनेकांना चित्रपटातील गोष्ट वाटायची. त्यांच्या लग्नाला अनेक दिग्गज आणि मान्यवर उपस्थित होते.त्यांनी २०२०च्या नोव्हेंबर महिन्यात घटस्फोटासाठी अर्ज दिला होता.आता जयपूरमधील कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटाची त्यांची विनंती मंजूर केली आहे.
 
टीना डाबी आणि अतहर खान हे राजस्थान केडरचे अधिकारी आहेत आणि दोघेही जयपूरमध्ये तैनात होते. अतहर खान आता जम्मू -काश्मीर सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर आहे आणि श्रीनगरमध्ये तैनात आहे.दिल्लीच्या लेडी श्री राम महाविद्यालयातील पदवीधर टीना डाबी, प्रतिष्ठित नागरी सेवा परीक्षेत अव्वल येणारी पहिली दलित तेही पहिल्याच प्रयत्नात बनल्यानांतर चर्चेत आली होती. त्या ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (CCI) यंग लीडर्सच्या सुकाणू समितीच्या मानद सल्लागार आहेत.या दोघांची जवळीक प्रशिक्षणादरम्यान झाली होती. परीक्षेच्या तयारीच्या काळातही ते एकत्र होते.
एप्रिल २०१८ मध्ये दिल्लीत दोघांचे लग्न झाले होते दिल्लीत त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय मंत्री आणि तत्कालीन लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन उपस्थित होत्या.त्यांनी आता तलाक घेतल्याचे ऐकून त्यांच्या चाहत्यांना दुःख झाले आहे. या दोघांच्या लग्नामुळे अनेक राजकारणी आणि मान्यवरांनी गाठ बांधल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांचे कौतुक केले. पण या जोडप्याला तीव्र प्रतिक्रियेलाही सामोरे जावे लागले होते.अखिल भारतीय हिंदू महासभेने या आंतरजातीय विवाहाला 'लव्ह जिहाद'चे प्रकरण म्हणून घोषित केले होते. गदारोळ दरम्यान, दाबीने सांगितले होते की तिचे लग्न धार्मिक मतभेदांपेक्षा वरचे आहे, आणि ती या वादामुळे प्रभावित झाली नव्ह्ती,परंतु त्यांच्या या घटस्फोटामुळे आता लव्ह जिहाद प्रकरणाविषयी पुन्हा बोलले जात आहे.