'लव्ह जिहाद'चा काहीही फरक पडत नाही म्हणणाऱ्या टीना डाबीवर घटस्फोटाची वेळ

    11-Aug-2021
Total Views |

 nEWS 1 _1  H x




नवी दिल्ली : सनदी अधिकारी टीना डाबी आणि अतहर आमीर खान यांच्या घटस्फोटाचा अर्ज जयपूर कौटुंबिक न्यायालयाने मंजूर केला आहे. २०१५ मध्ये यूपीएससीच्या परीक्षेत पहिले आणि दुसरे आलेल्या टीना आणि आमीर यांचे परीक्षेच्या तयारीपासूनच प्रेमसंबंध होते. प्रशिक्षणाच्या कालावधीत त्यांचे प्रेम अधिक घट्ट झाले. २०१८ मध्ये त्यांनी लग्न केले. त्यांची ही कथित प्रेमकथा अनेकांना चित्रपटातील गोष्ट वाटत होती.


दिल्लीतील नॉर्थ ब्लॉकच्या डीओपीटी कार्यालयात २०१६ सन्मान सोहळ्यात त्यांची पहिली भेट झाली होती. त्या सायंकाळी त्यांची भेट झाली आणि दोघांचे प्रेम आणखी घट्ट झाले. एका मुलाखतीत अतहरच्या व्यक्तीमत्वावर आपण प्रभावित असल्याचे तिने सांगितले होते. त्यांच्या लग्नाला अनेक दिग्गज आणि मान्यवर उपस्थित होते. त्यांनी २०२० रोजीच्या नोव्हेंबर महिन्यात घटस्फोटासाठी अर्ज दिला होता. आता जयपूरच्या कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटाची त्यांची विनंती मंजूर केली आहे.

टीना डाबी आणि अतहर खान हे राजस्थान केडरचे अधिकारी आहेत. दोघेही जयपूरमध्ये कर्तव्यावर होते. अतहर खान आता जम्मू -काश्मीर सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर आहेत आणि श्रीनगरमध्ये तैनात आहे. दिल्लीच्या लेडी श्री राम महाविद्यालयातील पदवीधर टीना डाबी, प्रतिष्ठित नागरी सेवा परीक्षेत अव्वल येणारी पहिली दलित तेही पहिल्याच प्रयत्नात बनल्यानांतर चर्चेत आली होती. त्या ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (CCI) यंग लीडर्सच्या सुकाणू समितीच्या मानद सल्लागार आहेत. या दोघांची जवळीक प्रशिक्षणादरम्यान झाली होती. परीक्षेच्या तयारीच्या काळातही ते एकत्र होते.


एप्रिल २०१८ मध्ये दिल्लीत दोघांचे लग्न झाले. दिल्लीतील त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. हिंदूत्ववादी संघटनांनी त्यांच्या या लग्नाला विरोध करत चुकीचा पायंडा पाडत असल्याचे मत व्यक्त केले होते. हा 'लव्ह जिहाद'चा तर प्रकार नाही ना, असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला. गदारोळा दरम्यान, दाबीने सांगितले होते की तिचे लग्न धार्मिक मतभेदांपेक्षा पुढे आहे. त्यावेळी दाबीने याचा माझ्यावर कसलाही परिणाम होणार नाही, असेही सांगितले होते. परंतू या घटस्फोटामुळे पुन्हा हा मुद्दा चर्चेत आला होता.