पुणे : राज्यात पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुक्यात 'झिका'चा रुग्ण आढळून आला आहे. आधीच कोरोनापासून सुटका झाली नसताना आय राज्यात 'झिका'मुळे चिंता वाढण्याची शंका आहे. असे असताना आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगितले आहे. तालुक्यातील बेलसर येथे झिका विषाणूचा एक रुग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण या आजाराचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण आहे. झिका विषाणूची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी झाली असून तिला तसेच कुटुंबियांमध्येही कोणाला काही लक्षणे नाहीत, असे आरोग्य विभागामार्फत सांगितले.
विषाणू सापडला पण घाबरण्याचे कारण नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे
याबाबत बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, "याबाबत काळजी करण्याची गरज नाही, या आजाराच्या रुग्णामध्ये जी लक्षणे आढळून आली आहे. त्यानुसार उपचार केले जात आहे. पुरंदर तालुक्यात साठलेल्या गोड पाण्यावर ईडीस डासांची उत्पत्ती होऊ नये, म्हणून आवश्यक पाऊल उचलून सर्वेक्षण करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आली आहे."