टोकियो : सध्या टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक २०२१मध्ये भारतीय खेळाडूंच्या पदरी हारच पडते आहे. मीराबाई चानूच्या पदकानंतर अद्यापही भारताला दुसरे पदक मिळाले नाही. मात्र, भारतीय खेळाडूंची कामगिरी पाहता त्यांनी चांगलीच टक्कर दिली आहे. असाच एक प्रसंग सर्वांच्या लक्षात राहिला. जेव्हा सात टाके असूनही भारतीय बॉक्सर सतीश कुमार हा रिंगणात उतरला. त्याने सामना जरी गमावला असला तरीही भारतीयांची मने त्याने जिंकली आहेत.
भारतीय बॉक्सर सतीश कुमारला टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत हार पत्करावी लागली आहे. या पराभवानंतर हे निश्चित झाले आहे की भारतीय पुरुष बॉक्सर एकही पदक या ऑलिम्पिकमध्ये मिळवू शकलेले नाहीत. भारताकडून एकूण ५ पुरुष बॉक्सर ऑलिम्पिकसाठी उतरले होते. सतीशला ९१ किलोग्रॅम वजनी गटातून उपांत्यपूर्वमध्ये उझ्बेकिस्तानचा बॉक्सर बखोदिर जलोलोवने ५-० ने हरवले.