भाजपचे निलंबित आमदार राज्यपालांच्या भेटीला

    05-Jul-2021
Total Views |
aashish shelar_1 &nb



मुंबई -
विधानसभेच्या अधिवेशनावेळी भाजप आमदारांनी गैरवतुर्णक केल्याचा ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. यानंतर हे निलंबित आमदार राज्यपालांच्या भेटीकरिता राजभवनावर पोहोचले आहेत. भाजपच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये भाजपचे महत्त्वाचे नेते आणि माजी मंत्र्यांच्या समावेश आहे.
 
 
  
तालिका अध्यक्ष भास्कर जाधव गैरवतुर्णक केल्याचा आणि राजदंड पळवण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवून भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीष महाजन, पराग अळवणी, राम सातपुते, हरिश पिंगळे, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, नारायण कुटे, बंटी भांगडिया आणि योगेश सागर या आमदारांचा समावेश आहे. सरकारच्या या कार्यवाहीचा निषेध या बाराही आमदारांनी केला. त्यानंतर या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी हे सर्व आमदार राजभवनावर पोहोचले आहेत. आशिष शेलार यांच्या नेतृत्वामध्ये हे आमदार राज्यपालांच्या भेटीला पोहोचले आहेत. या कारवाईच्या विरोधात ते राज्यपालांची चर्चा करणार आहेत.
 
 
 
अधिवेशनात काय घडले ?
तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सांगितले की, "विधानसभा तहकूब झाल्यावर आम्ही उपाध्यक्षांचा दालनामध्ये गेलो असता भाजपच्या काही आमदारांनी मला शिवीगाळ केली. तसेच धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. शिवाय राजदंडही पळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मधस्ती करुन भाजप आमदारांना आवरण्यासाठी सांगितले. मात्र, त्यांनी आम्ही तुमच्यावर रागवलो असून मी आमदारांना आवरणार नाही, असे सांगितले. घडलेली घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असल्यास तिची तपासणी करावी"
 
 
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?
तालिका अध्यक्षांनी ही माहिती सभागृहात दिल्यावर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजपच्या आमदारांविरोधात निलंबनाचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव मान्य झाल्यानंतर भाजपच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याविषयी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "शिवसेनेचे काही आमदार त्यावेळी त्याठिकाणी उपस्थित होते. त्यांच्यासोबत भाजपच्या आमदारांची धक्काबुक्की झाली. भास्कर जाधव यांनी देखील आम्हाला शिवीगाळ केली. ती शिवी मी बोलूही शकत नाही. अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाकडून विविध प्रकरणे काढण्याची भिती सरकारला असल्याने सरकारने भाजपच्या आमदारांवर ही कारवाई केली आहे."